25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेष११ राज्यातील बीआरओच्या ९० प्रकल्पांचे लोकार्पण

११ राज्यातील बीआरओच्या ९० प्रकल्पांचे लोकार्पण

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रम

Google News Follow

Related

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मूमध्ये दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) ११ राज्यांमधल्या ९० पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले. मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.

 

या ९० प्रकल्पांपैकी ३६ प्रकल्प हे अरुणाचल प्रदेश मध्ये, २६ लडाख मध्ये, ११ जम्मू आणि काश्मीरमध्ये, पाच प्रकल्प मिझोराम, तीन प्रकल्प हिमाचल प्रदेश, सिक्कीम उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी दोन प्रकल्प, नागालँड, राजस्थान आणि अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेश मधील नेचीफू बोगदा, पश्चिम बंगालमधील दोन विमानतळ, दोन हेलिपॅड, २२ रस्ते आणि ६३ पूल यांचे लोकार्पण करण्यात आले.

 

सीमा रस्ते संघटनेने सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची उभारणी विक्रमी वेळेत केली आहे. या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून सीमा रस्ते संघटना केवळ भारताच्या सीमांचे संरक्षण करणार नसून दुर्गम भागातल्या क्षेत्रांचा सामाजिक आर्थिक विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सीमा रस्ते संघटनेसोबत एकत्रितपणे आम्ही देश सुरक्षित राखणे आणि सीमावर्ती भागांचा विकास करणे सुनिश्चित करत आहोत. दुर्गम भागातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यामुळे आता नव भारतामधील एक नवा पायंडा निर्माण झाल्याचे राजनाथ यांनी सांगितले.

 

मंगळवारी उद्घाटन झालेल्या २ हजार ९०० कोटी रुपयांच्या ९० प्रकल्पांमुळे, २०२१ पासून आतापर्यंत सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. २०२२ मध्ये २ हजार ९०० कोटी रुपयांच्या १०३ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले तर २०२१ मध्ये २ हजार २०० कोटी रुपयांच्या १०२ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार

१०० कुटुंबांचं हसतं खेळतं गाव भुईसपाट

जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे जगभरातून कौतुक

सीमा रस्ते संघटनेच्या कामाची पद्धत आणि उभारले जाणारे प्रकल्प म्हणजे नागरी आणि लष्कर यांची सांगड दर्शवणारे एक उदाहरण आहे, अशा भावना राजनाथ यांनी व्यक्त केल्या. राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकांना देखील त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्याकडून अभिप्राय घेऊन त्यांना या कामांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा