25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरराजकारणऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढला. पण, सुनक काय बोलले ते त्यांना कळलं का? असा खोचक सवाल विचारात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

“मी जी- २० मध्ये सहभागी झालो. त्यामुळे ऐतिहासीक कार्यक्रम पाहायचं भाग्य मिळालं. या कार्यक्रमात भारताचा ठसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमटवला. त्यावरूनही विरोधकांची पोटदुखी वाढली. सरकार गेलं त्यामुळे त्यांच्या मनावरचा ताबा गेला आहे,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“उद्धव ठाकरे म्हणतात ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटलो. काय बोललो? त्यांना भेटल्याचा अभिमान होता. ऋषि सुनक मला म्हणाले, How is UT? मी म्हणालो Why? तर ऋषि सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात, प्रॉपर्टी बनवतात. थंडगार हवा खातात. लंडनला आले की मी तुम्हाला सगळं सांगतो,” असा सणसणीत टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

“आम्हाला सगळं माहिती आहे. बोलण्याची वेळ येऊ देऊ नका नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल. टीका करायची नाही. पण, कुणाची भेट घेतली तरी त्यांची जळते. बोलताना त्यांनी तारतम्य ठेवावे,” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

हे ही वाचा:

‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार

१०० कुटुंबांचं हसतं खेळतं गाव भुईसपाट

जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे जगभरातून कौतुक

पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?

जळगाव येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. राज्याला नरेंद्र मोदी यांचा नेहमी पाठिंबा राहतो. राज्यातील सरकार गतीमान झालं आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा