25 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरविशेषउद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे 'विदूषक' !

उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !

फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात G२० परिषद यशस्वीपणे पार पडल्याने भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचे आभार मानले. प्रधानमंत्री मोदींचे देशाबाहेर वाढते वजन पाहुन विरोधकांच्या पोटात दुखत असून उद्धव ठाकरे हे सध्या त्यांच्या भाषणात विदुषकाचं काम करून महाराष्ट्रातील जनतेला हसवण्याचं काम करत असल्याची टीका ठाकरे यांच्यावर केली.आज मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.मात्र आता उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या बद्दल जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी , अशी मागणीही श्रीमती वाघ यांनी केली.

 

चित्रा वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात भारताची मान उंचावली ,मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे. या नेत्यांच्या बालीशपणाची कीव येते . स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदुषकासारखी झाली आहे असे वाघ म्हणाल्या. विदुषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात पण हे कामदेखील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही अशी फटाकेबाजी त्यांनी मारली. यावेळी महिला मोर्चा तर्फे उद्धव ठाकरे यांना विदुषकाचा पोषाख पाठवत असून हा पोषाख पाहून ठाकरे यांना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल, असेही त्या म्हणाल्या.

 

हे ही वाचा:

शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट

पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?

‘जवान’ चित्रपट पाहताना अनुपम खेर यांनी मारल्या शिट्ट्या

उत्तर प्रदेशातील २४० मदरशांची मान्यता होणार रद्द

ठाकरे यांच्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांस सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत मात्र यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल, असेही श्रीमती वाघ यांनी सांगितले.ठाकरे यांच्या गटामध्ये महत्वाचे तीन विदूषक आहेत. त्यातील पहिल्या क्रमांकावर संजय राऊत तर दुसरे म्हणजे भास्कर जाधव आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वतः उद्धव ठाकरे आहेत.हे तीन विदूषक रोज सकाळी उठून महाराष्ट्राला हसवण्याचं काम करतात मात्र ते सुद्धा यांना व्यवस्थित येत नसल्याचे, वाघ यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर देशात पार पडलेल्या G२० परिषदेत उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री मोदींच्या बाजूला बसले असते, असा टोलाही ठाकरेंना लगावला.तसेच राम मंदिर बनत आहे तर उद्धव ठाकरे यांनी दंगली घडवण्याची भाषा न करता कधीतरी शुभ बोला, अशी टिप्पणी ठाकरेंवर केली.राम मंदिर उभ राहण्याचं स्वप्न अखंड हिंदुसमाजाचे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे देखील असल्याने ठाकरेंनी भान ठेवून बोलावे.काँग्रेसच्या बाजूला बसून तुम्ही सुद्धा हिंदू धर्म सोडल्याच्या भाषा करत आहेत हे दिसून येत आहे, त्या पुढे म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा