25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेष‘जवान’ चित्रपट पाहताना अनुपम खेर यांनी मारल्या शिट्ट्या

‘जवान’ चित्रपट पाहताना अनुपम खेर यांनी मारल्या शिट्ट्या

Google News Follow

Related

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘जवान’ या चित्रपटाचे रसिकप्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे. त्यातच सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीही ‘जवान’ हा चित्रपट चित्रपटगृहात पाहून चित्रपटाचा आनंद लुटला.

अनुपम खेर स्वत: जेव्हा चित्रपटगृहात पोहोचले, तेव्हा तेही ‘जवान’ चित्रपटाची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. अनुपम खेर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शाहरुख याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कौतुक करताना त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील संवादही लिहिला आहे.

अनुपम खेर सध्या अमृतसरमध्ये असून तिथेच त्यांनी हा चित्रपट पाहिला. ‘हा चित्रपट पाहून मी इतका उल्हसित झालो की, मी स्वत:ला शिट्ट्या वाजवण्यापासून थांबवू शकलो नाही. आता मुंबईला परत गेल्यावर मी शाहरुखला मिठी मारेन, असे त्यांनी लिहिले आहे.

हे ही वाचा:

बायडेन यांच्या हॉटेलचे नाव ‘पंडोरा’, सुनक यांचे ‘समारा’

‘मोदीजी, आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा’

‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

‘प्रिय शाहरुख, आताच अमृतसरच्या प्रेक्षकांसोबत मी तुझा ‘जवान’ चित्रपट पाहून बाहेर पडलो आहे. मजा आली’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एक्स’वर दिली आहे. ‘ऍक्शन दृश्ये, तुझा अभिनय खूपच चांगला झाला आहे. एक-दोन दृश्यांच्या वेळी तर मी शिट्ट्याही मारल्या. चित्रपटातील सगळ्यांचीच कामे मला खूप भावली. चित्रपटाची संपूर्ण टीम, विशेषत: लेखक-दिग्दर्शक ऍटलीला मनापासून शुभेच्छा. मुंबईमध्ये परत येऊन तुला मिठी मारून मी अवश्य बोलेन- ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला’, अशा शब्दांत त्यांनी ‘जवान’ चित्रपटाचे आणि शाहरुख खानचे कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा