30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरअर्थजगतशेण रु.५ / किलो

शेण रु.५ / किलो

Google News Follow

Related

शेणापासून बनवलेले ‘वैदिक पेंट’ लवकरच येणार बाजारात….

‘खादी इंडिया’ लवकरच बाजारात आपले नवे उत्पादन घेऊन येत आहे. खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत हे काम करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली. “भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळणार आहे. हे रंग पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अँटी फंगल, अँटी बॅक्टरीअल आणि वॉशेबल आहेत. यातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी रु.५५,००० पर्यंत फायदा होऊ शकतो” असे गडकरींनी म्हटले.

‘कुमारप्पा राष्ट्रीय हॅन्डमेड पेपर संस्था’ गेल्या अनेक वर्षांपासून असे रंग बनवत आहे. २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी याविषयीचे ट्विट केले होते. “आता देशात शेणापासून रंगही बनवले जातील. शेतकऱ्यांकडून रु.५ / किलो भावाने शेण खरेदी केले जाईल” असे सिंह यांनी म्हटले होते. शेणापासून बनवलेला रंग हा सामान्य रंगपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सामान्य रंगाचा बाजारभाव रु.२२५/लिटर असताना वैदिक रंग मात्र रु.११०/लिटर असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा