30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरअर्थजगतअदानी एन्टरप्रायझेसने केलेल्या शेअरविक्रीला तुफान प्रतिसाद

अदानी एन्टरप्रायझेसने केलेल्या शेअरविक्रीला तुफान प्रतिसाद

दिलेल्या ऑफरपेक्षाही अधिक शेअर्सची मागणी

Google News Follow

Related

एकीकडे हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे अदानी उद्योगसमुहाला मोठा आर्थिक फटका बसला असला तरी त्यांच्या अदानी एन्टरप्राइझने खुल्या केलेल्या शेअर्स विक्रीला तुफान प्रतिसाद लाभला. अदानी एन्टरप्रायझेसने २० हजार कोटींचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. तीन दिवस हे शेअर्स उपलब्ध होते. ४.५ कोटी शेअर्स उपलब्ध असताना मागणी होती ती ५ कोटी शेअर्सची. त्यामुळे एकूणच या शेअर्ससाठी लोकांच्या उड्या पडल्या होत्या. त्यातून जवळपा १६ हजार कोटी उभे करण्यात अदानीला यश आले.

पात्र वित्तसंस्थांनी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या १.२ कोटी शेअर्ससाठी तब्ब १.६ कोटी इतकी मागणी केली. त्यामुळे १.२६ पट ही मागणी वाढली. बिगरसंस्था गुंतवणूकदारांनी ३३२ टक्के इतके शेअर्स घेतले. त्यांच्यासाठी ९० लाख इतके शेअर्स ठेवलेले असताना मागणी आली ती ३.१ कोटी शेअर्सची. कर्मचाऱ्यांसाठी जे शेअर्स राखून ठेवले होते त्यासाठी ५५ टक्के अधिक मागणी आली.

हे ही वाचा:

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…आता राज्य गीत

भारतविरोधी षडयंत्राचे मूळ आय़एमएफच्या आकडेवारीत…

बलात्कारी आसाराम बापूला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,

हे शेअर्स उपलब्ध होण्याच्या आदल्या दिवशी २५ जानेवारीला पात्र वित्त संस्थांनी ६ हजार कोटींच्या शेअर्सवर आपले शिक्कामोर्तब केले होते. त्यात आयएचसीने ४० कोटी डॉलर्स इतके शेअर्स आपल्या खात्यात जमा केले. पहिल्या दिवशी म्हणजे २७ जानेवारीला विकत घेतलेले शेअर्स १ टक्का होते तर दुसऱ्या दिवशी ते ३ टक्के होते.

एकूणच अदानी उद्योगसमुहावर असलेला विश्वासच या खरेदीतून दिसून आला. ३१ जानेवारीला ही ऑफर समाप्त होणार होती, त्या दिवशी प्रति शेअरमागे किंमत होती ३११२ ते ३२७६ रु.

अदानी एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून ही २० हजार कोटी रक्कम ग्रीन हायड्रोजन, विमानतळ सुविधा, नव्या एक्स्प्रेस महामार्गांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. शिवाय, अदानी उद्योगसमुहातील आणखी काही कंपन्यांच्या कर्जाची परतफेडही या रकमेतून करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा