27 C
Mumbai
Thursday, October 1, 2026
घरबिजनेसभंडाऱ्यात १५,००० कोटींचा अशोक लेलँडचा इव्ही बॅटरी प्लांट

भंडाऱ्यात १५,००० कोटींचा अशोक लेलँडचा इव्ही बॅटरी प्लांट

नितीन गडकरींनी दिली माहिती

Google News Follow

Related

राज्यात विकासाची गती आता विदर्भ, मराठवाड्यासारख्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या भागांकडेही वळताना दिसत आहे. मोठे उद्योग, पायाभूत सुविधा आणि नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून या भागांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. गडचिरोलीसारख्या भागातही प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाचा वेग वाढताना दिसतोय. आता भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यांकडेही मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी पाहिले जात असल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अशोक लेलँड भंडाऱ्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कंपनीने हा प्रकल्प पुढे नेल्यास भंडाऱ्यात तब्बल १०,००० ते १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. विदर्भाला गुंतवणुकीचे केंद्र म्हणून पुढे आणताना गडकरी यांनी या भागातील औद्योगिक वातावरण, वाढती लॉजिस्टिक सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा उल्लेख केला. नागपूरमध्ये ड्राय पोर्ट कार्यान्वित असून त्यातून थेट निर्यातीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विदर्भातील उद्योगांना देशांतर्गत बाजारपेठेसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक लेलँडने यापूर्वीच भारतात बॅटरी उत्पादन आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात विस्तार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. कंपनीने २०२५ मध्ये पुढील पिढीतील बॅटरी विकसित आणि उत्पादित करण्यासाठी भारतात गुंतवणुकीची योजना जाहीर केली होती. या बॅटरींचा वापर इलेक्ट्रिक वाहनांसह ऊर्जा साठवणूक क्षेत्रात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

हे ही वाचा:

जंगल वॉरफेअर ते ड्रोन वॉरफेअर; भारत-अमेरिकेच्या जवानांचा युद्धसराव

आयआयटी मुंबईचे प्रा. डूल्ला अधिष्ठातापदावरून निलंबित

गणेश अन्नदानाच्या ठिकाणी हाडे-मांसाचा कचरा; तीन जण ताब्यात

“गणवेश नको, सेवा सुधारा!” पीआयएच्या नव्या गणवेशावरून वाद

गडकरी यांनी भारतातील वाहन उद्योगाच्या वाढीचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताचा ऑटोमोबाईल उद्योग जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून या उद्योगाचे मूल्य सुमारे २३ लाख कोटी रुपये आहे. पुढील पाच वर्षांत भारताला वाहन उद्योगात जागतिक क्रमांक एकवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा