जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारातील बेंचमार्क डिजिटल मालमत्ता बिटकॉइनच्या किंमतीत तीव्र घसरण नोंदवली गेली आहे. स्पॉट मार्केटमध्ये सलग विक्रीमुळे बिटकॉइनची किंमत १ लाख डॉलरच्या पातळीखाली गेली आहे. जोखमीच्या मालमत्तांमध्ये (रिस्क अॅसेट्स) मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विक्रीमुळे बिटकॉइनच्या दरांमध्ये ही घसरण दिसून येत आहे. अतिमूल्यांकनाबद्दल वाढत्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
बिटकॉइनने ९९,०१०.०६ डॉलरचा इंट्रा-डे लो (दिवसातील नीचांकी स्तर) गाठल्यानंतर ३.७ टक्क्यांनी घसरून १०१,८२२ डॉलरवर व्यवहार केला. ही किंमत मध्य जूननंतरची सर्वात कमी पातळी आहे. त्याचबरोबर, इथेरियमची किंमत ६.७६ टक्क्यांनी घसरून ३,३३१.६५ डॉलर झाली आहे. सोलाना ३.१६ टक्क्यांनी घसरून १५७.६६ डॉलर, आणि एक्सआरपी ३.१६ टक्क्यांनी घसरून २.२४ डॉलर झाली आहे. तसेच, डॉगकॉइनची किंमत १.४७ टक्क्यांनी घसरून ०.१६५ डॉलर झाली आहे.
हेही वाचा..
या केवळ अंतर्गत चाचण्या; कोणत्याही कार्यक्षम बिघाडाशी संबंध नाही!
चाचणी दरम्यान मोनोरेलचा अपघात; डबा रूळावरून घसरला
बिहारमध्ये एनडीए पुन्हा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल
“मदरसा शब्दावर आक्षेप नाही!” उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी असे का म्हणाले?
बिटकॉइनची किंमत या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीस झालेल्या १,२६,१८६ डॉलरच्या विक्रमी उच्चांकापेक्षा २० टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे बिटकॉइन आता बेअर मार्केटच्या क्षेत्रात प्रवेशला आहे. एनालिटिक्स कंपनी कॉइनग्लासच्या आकडेवारीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला १.२७ अब्ज डॉलरहून अधिक लेव्हरेज्ड क्रिप्टो पोझिशन्स लिक्विडेट झाल्या आहेत. किंमती वाढतील अशा पैज लावणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले असून, बहुतेक लिक्विडेशन लाँग-पोझिशन्समध्ये झाले आहेत. मागील २४ तासांत सुमारे २ अब्ज डॉलरच्या क्रिप्टो पोझिशन्स संपुष्टात आल्या असून, ४ लाखांहून अधिक ट्रेडर्सना नुकसान झाले आहे. अहवालांनुसार, बिटकॉइन फ्यूचर्समध्ये ओपन इंटरेस्ट कमी दिसत आहे. त्याचवेळी, ऑप्शन्स ट्रेडर्स ८० हजार डॉलरच्या पातळीला लक्ष्य करत, पुट कॉन्ट्रॅक्ट्सच्या माध्यमातून आणखी घसरणीवर पैज लावत आहेत.







