मुंबईत मोनो रेलचा अपघात झाल्याने खळबळ उडाली. मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झाला. या अपघातादरम्य मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली घसरून एका बाजूला झुकला. सुदैवाने यात प्रवासी नव्हते त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात झाला. ट्रायल रन सुरु असताना मोनोरेलचा एक डबा रूळावरून खाली घसरून खालच्या दिशेने झुकला. सकाळी ९ वाजताच्या सुमारास वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळील वडाळा डेपोजवळ हा अपघात घडला. नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला. या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे. सुदैवाने, मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते. केवळ दोन कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते.
हे ही वाचा:
बिहारमध्ये एनडीए पुन्हा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल
“मदरसा शब्दावर आक्षेप नाही!” उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी असे का म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधानंतरही जोहरान ममदानी विजयी
किश्तवाडच्या दुर्गम छत्रू भागात चकमक; तीन दहशतवादी लपल्याचा संशय
मोनोरेलची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी MMMOCL ने अत्याधुनिक कम्युनिकेशन- बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग प्रणाली लागू करण्याचे काम हाती घेतले आहे. या नवीन प्रणालीची आणि गाड्यांची चाचणी सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, मोनोरेलचे कर्मचारी आणि एमएमआरडीए अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या घसरलेला डबा काढण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.







