न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी हे विजयी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता, मात्र तरीही त्यांचा विजय झाला आहे. या विजयामुळे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम तसेच आजवरचे सर्वात तरूण महापौर बनले आहेत.
बुधवारी सकाळी ममदानी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्रयू कुओमो, तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून उघड विरोध केला होता. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्क शहराचा निधी अडवू, असा इशारा त्यांनी दिला होता. “ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील स्वयंघोषित कम्युनिस्ट आहेत. ते जर महापौरपदाची निवडणूक जिंकले तर त्यांना वॉशिंग्टनकडून विरोधाचा सामना करावा लागेल. न्यूयॉर्क सारख्या महान शहराच्या महापौराने इतिहासात कधीही वॉशिंग्टनशी वैर घेतले नव्हते. मात्र ममदानी यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडूनच निधीची गरज भासेल. त्यांना अजिबात निधी दिला जाणार नाही. मग त्यांना मतदान करण्यात काय अर्थ आहे?,” अशी धमकी देणारी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
हे ही वाचा:
किश्तवाडच्या दुर्गम छत्रू भागात चकमक; तीन दहशतवादी लपल्याचा संशय
बद्धकोष्ठतेपासून डायबिटीजपर्यंत प्रत्येक आजारावर उपाय काय ?
महिला पर्यटक छळप्रकरण: टॅक्सीचालकांचे परवाने रद्द होणार
मालवणीतील ढाकावर बुलडोजर फिरला; स्लम खानला देवाभाऊंचा दणका
शहर निवडणूक मंडळाच्या मते २० लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९६९ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. जोहरान ममदानी यांना ९,४८,२०२ मते (५०.६ टक्के) मिळाली. अपक्ष उमेदवार अँड्रयू कुओमो यांना ७,७६,५४७ (४१.३ टक्के) आणि कर्टिस स्लिवा यांना १,३७,०३० इतके मतदान झाले.







