जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी पहाटे चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. किश्तवाड जिल्ह्याच्या दुर्गम अशा छत्रू भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या परिसरात तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किश्तवाडच्या छत्रू भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पहाटे शोध मोहीम सुरू केली. “व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सतर्क सैन्याने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने छत्रूच्या सामान्य भागात दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित केला. गोळीबार झाला आहे आणि सध्या ऑपरेशन सुरू आहे,” असे व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
बद्धकोष्ठतेपासून डायबिटीजपर्यंत प्रत्येक आजारावर उपाय काय ?
महिला पर्यटक छळप्रकरण: टॅक्सीचालकांचे परवाने रद्द होणार
मालवणीतील ढाकावर बुलडोजर फिरला; स्लम खानला देवाभाऊंचा दणका
जेवणासाठी हत्येचा थरार! साकिनाक्यात वादातून मित्राचा जीव घेतला
माहितीनुसार, या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचा अंदाज आहे. हा गट गेल्या काही महिन्यांपासून या भागात सक्रिय आहे आणि सुरक्षा दल त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. किश्तवारच्या उंच भागात असलेल्या छत्रू भागात गेल्या वर्षभरात अधूनमधून दहशतवादी कारवाया झाल्या आहेत, अलिकडच्या काही महिन्यांत सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. ऑपरेशन सुरू असल्याने अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.







