30 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरबिजनेसदुबईत २०२६ अखेरपासून पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवेत

दुबईत २०२६ अखेरपासून पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवेत

शहरी वाहतुकीत मोठी क्रांती

Google News Follow

जगातील शहरी वाहतुकीत मोठी क्रांती घडवणारी इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा २०२६ च्या अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सेवा सर्वप्रथम दुबई येथे व्यावसायिक स्वरूपात सुरू होण्याची शक्यता आहे. दुबई प्रशासनाने शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून हवाई टॅक्सी प्रकल्पाला गती दिली आहे.

या प्रकल्पासाठी अमेरिकेतील जोबी एव्हिएशन या कंपनीची इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (eVTOL) विमानं वापरण्यात येणार आहेत. ही विमानं पूर्णपणे इलेक्ट्रिक असून त्यातून कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या एअर टॅक्सीमध्ये पायलटसह चार प्रवासी बसू शकतात आणि शहरातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

हे ही वाचा: 

ब्राझिलची एम्ब्रेयर कंपनी भारताला २०० विमाने विकणार!

भारतासोबत रणगाडे निर्मितीसाठी रशिया उत्सुक

काँग्रेसचा शर्टलेस निषेध नेपाळच्या जनरल झेड चळवळीपासून प्रेरित!

आरएसएसविषयी केलेल्या विधानानंतर राहुल गांधी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात; प्रकरण काय?

दुबईतील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शहरात विशेष ‘व्हर्टीपोर्ट’ उभारले जात आहेत. हे छोटे हवाई स्थानक असतील, जिथून एअर टॅक्सी उड्डाण आणि लँडिंग करू शकतील. सुरुवातीला विमानतळ, डाउनटाउन आणि प्रमुख व्यावसायिक भागांना जोडणाऱ्या मार्गांवर ही सेवा सुरू होईल. अधिकृत माहितीनुसार २०२६ च्या अखेरीस मर्यादित प्रमाणात व्यावसायिक सेवा सुरू होईल आणि नंतर टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल.

दरम्यान, भारतातही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रकल्पावर काम सुरू आहे. चेन्नईस्थित दि ईप्लेन कंपनी या स्टार्टअपने स्वतःचे eVTOL विमान विकसित केले असून चाचणी टप्पा सुरू आहे. तसेच इंटरग्लोब समूह आणि अमेरिकन कंपनी आर्चर एव्हिएशन यांच्यातही भागीदारी झाली आहे. भविष्यात दिल्लीसारख्या महानगरांत एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक एअर टॅक्सी ही शहरी वाहतुकीतील पुढची मोठी पायरी ठरू शकते. वेगवान प्रवास, कमी आवाज, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि कमी वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्याची क्षमता यामुळे या सेवेला मोठी मागणी असू शकते. मात्र, सुरक्षितता मानके, सरकारी मंजुरी आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होईल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा