28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरबिजनेसदिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

ग्राहकांना खरेदीची संधी

Google News Follow

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार अनुभवणाऱ्या सराफा बाजारात ३१ ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता या दरघसरणीमुळे ग्राहकांना दागिने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने बाजारातील खरेदीदारांचे लक्ष नव्या दरांकडे लागले आहे.

मुंबईतील सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ३८ हजार ५८० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १ लाख २७ हजार ०३२ रुपये नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, एक किलो चांदीसाठी ग्राहकांना १ लाख ७९ हजार १०० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीच्या किमतींनी मोठी झेप घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले होते. मात्र, सध्याच्या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकन शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’!

लंडनमध्ये असल्याचे भासवून तरुणीचे पुण्यात वास्तव्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मतचोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्यास तयार

अवकाश शास्त्रज्ञांच्या समर्पणाचा देशाला अभिमान!

दरम्यान, सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेची माहिती असणेही महत्त्वाचे आहे. २४ कॅरेट सोने हे ९९.९ टक्के शुद्ध असते, तर २२ कॅरेट सोन्यामध्ये सुमारे ९१ टक्के शुद्ध सोने असते. उर्वरित भागात तांबे, चांदी आणि जस्त यांसारख्या धातूंचे मिश्रण केले जाते. २४ कॅरेट सोने अधिक शुद्ध असले तरी ते तुलनेने मऊ असल्याने त्यापासून दागिने तयार करता येत नाहीत. त्यामुळे दागिन्यांसाठी प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. ग्राहकांनी खरेदीपूर्वी सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्कची खात्री करणे आवश्यक आहे.

मात्र, सोन्या-चांदीचे हे दर सूचक स्वरूपाचे असून, त्यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. तसेच सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ शुल्क आकारले जात असल्याने प्रत्यक्ष खरेदीचा खर्च वाढू शकतो. उत्पादन शुल्क, राज्यनिहाय कर आणि सराफा पेढ्यांनुसार अंतिम किमतींमध्येही फरक असू शकतो. त्यामुळे दागिने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून अद्ययावत दरांची माहिती घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा