36 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरबिजनेसदिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण

खरेदीपूर्वी आजचे दर जाणून घ्या

Google News Follow

दिवाळीचा सण संपल्यानंतरही सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्यांसाठी आजचे बाजारभाव महत्त्वाचे ठरत आहेत. १० नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांमधील दरांची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

आजच्या बाजारभावानुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ६४० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ६७० रुपये नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ८७ हजार ७२० रुपयांवर पोहोचला असून १० ग्रॅम चांदीसाठी ग्राहकांना १ हजार ८७७ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्येही सोन्याचे दर महत्त्वपूर्ण पातळीवर कायम आहेत. मात्र, स्थानिक सराफा बाजारानुसार दरांमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो.
हे ही वाचा:
ठाकुर्लीत अटक केलेल्या नक्षलवाद्याच्या माहितीवरून झारखंडमध्ये शस्त्रसाठा जप्त

ट्रम्प यांच्या एका विधानाने कच्च्या तेलाच्या बाजाराला मोठा धक्का

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका; बसला आग लावल्याने चालकाचा मृत्यू

काळबादेवीत भररस्त्यावर रॉकेट फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा

दरम्यान, सोन्याची खरेदी करताना २२ आणि २४ कॅरेटमधील फरक समजून घेणेही आवश्यक आहे. २४ कॅरेट सोने अधिक शुद्ध असल्याने त्याचा वापर प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी केला जातो, तर दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याला अधिक पसंती दिली जाते. सोन्या-चांदीच्या किमतींवर आंतरराष्ट्री य बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि मागणी-पुरवठा यांचा परिणाम होत असतो. त्यामुळे दरांमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येतात. ग्राहकांनी दागिने खरेदी करताना सोन्याचा प्रत्यक्ष दर, हॉलमार्क, घडणावळ आणि जीएसटी यांची खात्री करूनच व्यवहार करावा.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा