28 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरबिजनेसजीटीए ६ ची पहिल्याच दिवशी २२ हजार कोटींची विक्रमी कमाई

जीटीए ६ ची पहिल्याच दिवशी २२ हजार कोटींची विक्रमी कमाई

धमाकेदार लॉन्चिंग

Google News Follow

जगभरातील गेमिंगप्रेमींची प्रतीक्षा संपवत रॉकस्टार गेम्सच्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (जीटीए ६) ने बाजारात दाखल होताच कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या गेमच्या विक्रीतून अंदाजे २.३६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २२ हजार कोटी रुपयांची कमाई झाल्याचा अंदाज बाजार संशोधन संस्था सेन्सर टॉवरने व्यक्त केला आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत गेमच्या सुमारे २ कोटी ४५ लाख ८० हजार प्रतींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आकड्यामुळे गेमिंग उद्योगाची आर्थिक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

जीटीए ६ च्या कमाईची तुलना जागतिक मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या विक्रमांशी केली जात आहे. पॉपस्टार टेलर स्विफ्टच्या ‘एरास टूर’ने १४९ कार्यक्रमांमधून २.०८ अब्ज डॉलरची कमाई केली होती. तर जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने जगभरात सुमारे २.३३४ अब्ज डॉलरची कमाई केली होती. जीटीए ६ च्या अंदाजित विक्रीने हे दोन्ही आकडे मागे टाकले आहेत. ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’च्या २.९४ अब्ज डॉलरच्या जागतिक कमाईच्या तुलनेतही गेमने जवळपास ८० टक्के मजल मारली आहे.

हे ही वाचा:
अँथ्रोपिकच्या आयपीओने कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले

सोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले

रॉयल एनफिल्डची आता स्वस्त बाईक येणार

शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात पाहिले तर २२ हजार कोटी रुपयांची ही रक्कम अधिकच मोठी वाटते. मुंबईतील अटल सेतूच्या उभारणीसाठी सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च झाले होते. जीटीए ६ च्या अंदाजित कमाईतून हा संपूर्ण खर्च भागवून चार हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शिल्लक राहू शकते. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या १९ हजार ६५० कोटी रुपयांच्या खर्चापेक्षाही ही कमाई अधिक आहे.

विशेष म्हणजे, २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जीटीए ५ ने पहिल्या दिवशी ८० कोटी डॉलरची विक्री केली होती. त्या तुलनेत जीटीए ६ ची अंदाजित कमाई जवळपास तिप्पट आहे. या गेमच्या निर्मितीसाठी किमान एक अब्ज डॉलर खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र, सेन्सर टॉवरच्या आकडेवारीत प्री-ऑर्डरचा समावेश असल्याने संपूर्ण कमाई लॉन्चनंतरच्या २४ तासांतील नाही. टेक-टू इंटरॅक्टिव्हनेही या आकड्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आगामी काळात ऑनलाइन गेमिंग आणि पीसी आवृत्तीमुळे कंपनीच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा