32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरअर्थजगतजाणून घ्या.. हे झाले स्वस्त, हे झाले महाग

जाणून घ्या.. हे झाले स्वस्त, हे झाले महाग

अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क कमी

Google News Follow

Related

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली, तर अनेक जुने शुल्क हटवण्याची घोषणाही केली. तसेच अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे बजेट मध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आणि कोणत्या महागल्या हे जाणून घेऊया

या घोषणेनुसार आता सरकार सिगारेटवरील शुल्कात वाढ करणार आहे. सध्या त्यात १६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी त्यांनी एलईडी टीव्हीसोबतच सरकारने मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, खेळणी, इलेक्ट्रिकल वाहने, हिऱ्यांचे दागिने, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल आणि सायकलच्या किमती कमी केल्या आहेत. एलईडी टीव्ही आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या किमती कमी झाल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यासोबतच सायकल स्वस्त झाल्यामुळे प्रदूषणाची पातळीही कमी होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिक किचन चिमणीच्या किमतीत आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. या घोषणेनंतर आता देशी चिमणीची किंमत कमी होणार आहे.

हे ही वाचा:

७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले पण म्हणजे नेमके कसे?

फडणवीस म्हणाले, सर्वजनहिताय अर्थसंकल्प

निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ‘सप्तर्षी’चा केला उल्लेख?

आशीर्वाद टॉवरला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू,

एकीकडे सरकारने हिऱ्यांचे दागिने स्वस्त केले आहेत. मात्र, लोकांना सोने खरेदी करणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होणार आहे. सोन्याच्या दरात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तूही पूर्वीच्या तुलनेत महागणार आहेत. प्लॅटिनमही पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. एकूणच, सरकारने सोने, चांदी, तांबे आणि प्लॅटिनमपासून बनवलेल्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवल्या आहेत. देशातील मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या सुट्या भागाच्या आयातीवरील सीमाशुल्क २. ५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मोबाईल स्वस्त होणार आहे.

या वस्तू स्वस्त : एलईडी टेलिव्हिजन,  बायो गॅसशी संदर्भातील वस्तूंची दर, खेळणी, सायकल , मोबाईल फोन, टेलिव्हिजन, बॅटरी वरील आयात शुल्क होणार कमी,

या वस्तू महाग :  स्वयपाकाच्या गॅसची चिमणी, सोन्या-चांदीचे दागिने, सिगारेट

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा