28.6 C
Mumbai
Saturday, August 1, 2026
घरक्राईमनामाजोगेश्वरी पोलिसांनी दीड तासात स्पेशल चाईल्डचा लावला शोध

जोगेश्वरी पोलिसांनी दीड तासात स्पेशल चाईल्डचा लावला शोध

पालकांशी घडवून दिली भेट

Google News Follow

Related

जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतःचे नाव व पत्ता सांगता न येणाऱ्या ८ वर्षीय स्पेशल चाईल्डचा शोध घेऊन, पोलिसांनी अवघ्या दीड तासात त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले आहे. पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांनी दाखवलेल्या सतर्कता आणि तत्परतेमुळे ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.

३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुभाष रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथील येवले चहा दुकानासमोर पायी गस्तीदरम्यान पोलीस नाईक मिसाळ यांना एक ७ ते ८ वर्षांचा मुलगा एकटाच रडताना आढळला. त्याला नाव व पत्ता विचारला असता, तो बोलू शकत नसल्याने केवळ “अब्बा” आणि “अम्मा” एवढेच शब्द उच्चारत होता.
पोलीस नाईक मिसाळ यांनी मुलाच्या टी-शर्टवरील बृहन्मुंबई महानगरपालिका हिंदी शाळा, जोगेश्वरी (पूर्व) या उल्लेखावरून शाळेत संपर्क साधला.

शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगा ‘सोपान स्पेशल इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये शिकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिक्षिका श्रीमती नेहा तेंडुलकर यांच्या मदतीने मुलाची ओळख पटवून पालकांची माहिती मिळवण्यात आली. या मुलाचे नाव मोहम्मद शहबाज अन्सारी (वय ८ वर्षे) असून त्याचे वडील श्री. रियाज अहमद अकबर अली अन्सारी असल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

वंदे भारत ठरली लाईफलाईन; प्रथमच जिवंत हृदयाची वाहतूक

नेपाळमध्ये सांप्रदायिक हिंसाचाराचा भडका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा

पाकिस्तानातील कोळसा खाणीत भीषण स्फोट

पालकांशी तात्काळ संपर्क साधून त्यांना जोगेश्वरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि आवश्यक खातरजमा करून मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या देखरेखीखाली आणि उच्च पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा