30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरअर्थजगतस्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार

स्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तीर्थस्थानांना दिले प्राधान्य

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गड – किल्ल्यांप्रमाणेच राज्यातील स्मारके, स्मृतिस्थळे, तीर्थस्थाने यांच्या विकासावर पण मोठ्या प्रमाणावर  भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकांच्या उभारणीला मोठी चालना दिली आहे. भीमाशंकरसह महाराष्ट्रातील पाच ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच भाविकांसाठी देखील चांगली सोयी होणार आहेत . रोजगारही चालना मिळण्यास मदत होणार आहे.

इंदूमिलसाठी भरीव निधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासाठी ३४९ कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. या स्मारकासाठी आणखी ७४१ कोटी रुपये देन्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याच बरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढू बुद्रूक स्मारकांसाठी निधी जाहीर करण्यात आला आहे. भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारकासाठी २५ कोटी रुपये, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपये, अमरावतीच्या स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपये आणि विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी देण्यात आला आहे. स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली)२० कोटी रुपये, श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास ५०० कोटी रुपये, प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या तीन ठिकाणी स्मारके

विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या तीन ठिकाणी स्मारके उभारण्यात येणार आहेत. गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी २५ कोटी रुपये श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर ६ कोटी रुपये, श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) २५ कोटी रुपये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक उभारण्यात येणार आहे.

ज्योतिर्लिंगाचा विकास

भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास क्षेत्रासाठी ५००कोटी रुपये, श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण ५० कोटी रुपये, श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये, श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी जाहीर करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा