27 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरबिजनेसभारतीय अर्थव्यवस्था ९% पेक्षा जास्त गतीने वाढणार

भारतीय अर्थव्यवस्था ९% पेक्षा जास्त गतीने वाढणार

Google News Follow

Related

पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा ९ टक्क्यांच्या वर राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील असेही कंपनीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी भारताचा जीडीपी १०.५ टक्के राहणार असल्याची शक्यता देखील संस्थेने वर्तवली आहे.

दरम्यान चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जीडीपीचा वृद्धिदर ९ टक्क्यापर्यंत राहाण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्तवण्यात आला होता.

याबाबत बोलताना सुइसने सांगितले की, कोणत्याही देशाच्या आर्थिक वृद्धी दराबाबत अंदाज वर्तवणे हे कंपनीच्या धोरणामध्ये येत नाही. मात्र प्राप्त आकडेवारीवर नजर टाकल्यास पुढील वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा नऊ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे की, पुढील काळात आर्थिक वृद्धी दर हा ९ टक्क्यांपर्यंत जाईलच, मात्र या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धीदरात आणखी वाढ होऊ शकते.

हे ही वाचा:

लस न घेऊन अखिलेशकडून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा अपमान

लिथुएनिया तैवान संबंधांमुळे चीनची आगपाखड

विकी आणि कतरिना लग्न बंधनात

महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. आर्थिक वृद्धी दरात मोठ्याप्रमामात घसरण झाली होती. गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २० टक्क्यांपेक्षा जास्त आक्रसली होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून, उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे आर्थवव्यस्था देखील रुळावर येत असल्याचे पहायाला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट न आल्यास आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा