30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरबिजनेसडॉलरच्या तेजीला रुपयाने दिले आव्हान

डॉलरच्या तेजीला रुपयाने दिले आव्हान

आठ महिन्यांच्या उच्चांकावर भारतीय चलन

Google News Follow

जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरने गेल्या २० महिन्यांतील उच्चांक गाठला असतानाही भारतीय रुपयाने मात्र जोरदार पुनरागमन केले आहे. नोव्हेंबर महिन्यात रुपयामध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली असून, २६ नोव्हेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ९२.२० च्या आसपास पोहोचला. विशेष म्हणजे, मे २०२६ मध्ये रुपया ९६.९६ या नीचांकी स्तरावर घसरला होता. तेथून रुपयाने जवळपास ५ टक्क्यांची सुधारणा केली आहे. जागतिक स्तरावर डॉलर मजबूत होत असताना भारतीय चलनाची ही झेप अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

रुपयाच्या मजबुतीमागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरण. नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भारत आपल्या गरजेचे बहुतांश कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या की भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागतात. परिणामी रुपयावर दबाव निर्माण होतो. मात्र, तेल स्वस्त झाल्यामुळे भारताचा आयात खर्च आणि डॉलरची मागणी कमी होण्यास मदत झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय चलनाला मिळत आहे.
हे ही वाचा:
आरबीआयने ७४० टन सोने आणले मायदेशी

पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

दुसरीकडे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये या गुंतवणूकदारांनी १५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५० लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत त्यांनी भारतीय बाजारातून जवळपास ३३ अब्ज डॉलर काढले होते. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्स खरेदी करण्यासाठी डॉलर विकून रुपये खरेदी करतात. त्यामुळे बाजारात डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयाला बळ मिळते. याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या चलन बाजारातील हस्तक्षेपामुळेही रुपयाला आधार मिळाला आहे.

आता रुपयाची ही तेजी किती काळ टिकणार, याकडे अर्थविश्वाचे लक्ष लागले आहे. कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि अमेरिकन डॉलरची जागतिक स्थिती हे घटक रुपयाची पुढील दिशा ठरवतील. परदेशी गुंतवणूक कायम राहिली आणि तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या, तर रुपयाला आणखी बळ मिळू शकते. मात्र, जागतिक परिस्थिती बदलल्यास पुन्हा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला भारतीय रुपयाने दिलेले हे आव्हान सध्या आर्थिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा