30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरबिजनेसनिर्मला सीतारमण यांच्या एका विधानाने शेअर बाजारात दिवाळी!

निर्मला सीतारमण यांच्या एका विधानाने शेअर बाजारात दिवाळी!

दोन दिवसांत गुंतवणूकदारांची १० लाख कोटींची कमाई

Google News Follow

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दीर्घकालीन भांडवली नफा कर अर्थात एलटीसीजी टॅक्सच्या रचनेचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर दिसून आला. अवघ्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १० लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून ४८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर कायम राहिला. सकाळी अकरा वाजेपर्यंत सेन्सेक्स ८१५ अंकांनी वधारून ७६ हजार ५०७ अंकांवर पोहोचला, तर निफ्टी २२२ अंकांच्या वाढीसह २३ हजार ६६३ अंकांवर व्यवहार करत होता. बाजारातील तेजीचे नेतृत्व इंडिगो आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी केले. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली.
हे ही वाचा:
तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्ताचे निलंबन

माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक

छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त
विशेष म्हणजे, बाजारातील ही तेजी केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहिली नाही. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. निफ्टी ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये काहीसा दबाव दिसला. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. आदल्या दिवशी याच शेअरमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली होती.

दरम्यान, एलटीसीजी कराच्या रचनेत बदल होण्याच्या शक्यतेमुळे बाजारातील सकारात्मक वातावरणाला आणखी बळ मिळाले आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून या कररचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुंतवणूकदारांच्या चिंता लक्षात घेऊन या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, करात बदल करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे सरकारच्या पुढील भूमिकेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा