36 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरबिजनेसअमेरिकेत भारतीय उद्योगसमूह एस्सारचा ‘पोलादी’ विस्तार

अमेरिकेत भारतीय उद्योगसमूह एस्सारचा ‘पोलादी’ विस्तार

१५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

Google News Follow

Related

भारतीय उद्योगसमूह एस्सार समूह अमेरिकेत मोठी गुंतवणूक करणार आहे. एस्सार समूहाच्या मालकीची अमेरिकेतील कंपनी मेझाबी मेटॅलिक्स आयोवा राज्यात तब्बल १५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून भव्य असा पोलाद प्रकल्प उभारणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये या प्रकल्पाची घोषणा केली. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पोलाद प्रकल्पांपैकी एक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पातून २०३० पासून पोलाद उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर येथे दरवर्षी सुमारे १ कोटी टन पोलादाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची उत्पादन क्षमता सुमारे ७५ लाख टन प्रतिवर्ष असेल. या प्रकल्पामुळे आयोवा राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. बांधकामाच्या टप्प्यात सुमारे ६,००० रोजगार, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुमारे १,७५० कायमस्वरूपी रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एकात्मिक पोलाद प्रकल्प असणार आहे. आयोवामधील प्रकल्पासाठी लागणारे लोखंडाचे धातुक अर्थात लोहखनिज एस्सार समूहाच्या मिनेसोटातील खाणीतून आणले जाणार आहे. मिनेसोटातील या खाण प्रकल्पासाठी कंपनीने सुमारे २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या खाणीतून दरवर्षी सुमारे ७५ लाख टन लोहखनिजाचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, खनिज उत्खननापासून त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि पुढे त्यापासून पोलाद उत्पादनापर्यंतची संपूर्ण साखळी अमेरिकेतच उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मिनेसोटातील खाणीतून काढलेले लोहखनिज अमेरिकन रेल्वेमार्गे आयोवातील प्रकल्पापर्यंत नेले जाणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून पोलाद तयार केले जाणार आहे.

हे ही वाचा:

उज्जैनमधील मशिदीच्या वादात एआय व्हिडीओने पेटवली अफवांची ठिणगी

रामजन्मभूमी आंदोलनातील अशोकजींची त्यागमूर्ती कोण विसरेल?

भारतात ७ हजार वनडे धावा; विराट कोहलीने रचला विश्वविक्रम!

‘किंग’ कोहलीचा विराट शो!

एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी भर

आयोवातील पोलाद प्रकल्पासाठी १५ अब्ज डॉलर गुंतवले जाणार असले, तरी अमेरिकेतील या संपूर्ण पोलाद साखळीत एस्सार समूहाची एकूण गुंतवणूक सुमारे १८ अब्ज डॉलर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यातील उर्वरित गुंतवणूक मिनेसोटातील लोहखनिज खाण आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे खाणकामापासून अंतिम पोलाद उत्पादनापर्यंतची एकात्मिक व्यवस्था उभारण्यावर कंपनीचा भर आहे. या प्रकल्पामुळे अमेरिकेच्या पोलाद उद्योगाच्या उत्पादन क्षमतेत मोठी भर पडणार आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७५ लाख टन, तर पुढील विस्तारानंतर १ कोटी टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा