29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरबिजनेसघर खरेदीसाठी बंगळुरू, मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक पसंती

घर खरेदीसाठी बंगळुरू, मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक पसंती

घरांच्या विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Google News Follow

देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा एकदा तेजीचे संकेत मिळत आहेत. घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून, बंगळुरू, मुंबई आणि पुणे ही तीन शहरे घरखरेदीदारांची प्रमुख पसंती ठरली आहेत. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी जेएलएलच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये एकूण ७६ हजार १८१ घरांची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ६७ हजार ९७४ घरांची विक्री झाली होती. विशेष म्हणजे, एकूण घरविक्रीपैकी जवळपास ६० टक्के वाटा या तीन शहरांचा आहे.

या शहरांमध्ये बंगळुरूने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. तिसऱ्या तिमाहीत बंगळुरूमध्ये १९ हजार २०८ घरांची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. मुंबईत १३ हजार ५९५ घरांची विक्री झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास स्थिर राहिला आहे. तर पुण्यात मात्र घरविक्रीत सुमारे ११ टक्क्यांची घट झाली. पुण्यात या तिमाहीत १२ हजार ३७१ घरांची विक्री झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास, वाढते शहरीकरण आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने असलेले आकर्षण यामुळे या शहरांमध्ये घरांना मागणी कायम असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
विश्वचषकापूर्वी विराटची शतकांची सेंच्युरी कठीण!

मर्सिडीज-बेंझची पुण्यात २०० कोटींची गुंतवणूक

सरन्याधीशांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केरळ काँग्रेसला अवमान नोटीस

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

घरांच्या बाजारपेठेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे महागड्या आणि आलिशान घरांची वाढती मागणी. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांचा विक्रीतील वाटा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी हा वाटा ६२ टक्के होता. विशेषतः दीड ते तीन कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत २३ टक्क्यांची घट झाली आहे. यावरून घरखरेदीचा कल प्रीमियम आणि लक्झरी विभागाकडे अधिक झुकत असल्याचे स्पष्ट होते.

जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये एकूण २.१४ लाख घरांची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राने पुन्हा गती पकडल्याचे दिसत असले, तरी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. महागड्या घरांना मागणी वाढत असताना मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरखरेदी अधिक आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे आगामी काळात रिअल इस्टेट क्षेत्राची खरी कसोटी केवळ विक्री वाढवण्याची नसून, परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचीही असेल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा