29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरअर्थजगतLIC IPO के साथ भी !

LIC IPO के साथ भी !

Google News Follow

Related

एलआयसीच्या बहुचर्चित आयपीओ ज्याची सर्वजण वाट पाहत होते त्याची अखेर घोषणा करण्यात आली आहे. एलआयसी आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सांगितले आहे. आयपीओचा फुल फॉर्म Initial public offering असा आहे.

आयपीओ म्हणजे जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा आपण मित्रपरिवाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतो. तसेच जेव्हा कंपनीलाही पैशांची गरज असते तेव्हा ती कंपनी लोकांकडून पैसे जमा करते कारण बँकेला मोठ्या रकमेचे व्याज द्यायला कंपनीला परवडत नाही. म्हणून जेव्हा कंपनीला पैशाची गरज लागते तेव्हा कंपनी लोकांकडून पैसे जमा करते, त्यासाठी प्रथम ती कंपनी मार्केटमध्ये आपला आयपीओ घेऊन येते. यामध्ये कंपनी लोकांना ऑफर देते, तुम्ही आमच्या कंपनीत पैसे गुंतवा त्या बदल्यात आम्ही तुम्हला शेअर्स देतो म्हणजेच, कंपनी लोकांना स्वतःच्या कंपनीचा भागीधारक बनवतो. म्हणजे जी कंपनी आतापर्यंत प्राव्हेट असते ती मार्केटमध्ये आल्यानंतर पब्लिक होते. कंपनीला बाजारात अजून विस्तार करायचा असेल किंवा कंपनीवर कर्ज झाले असेल तेव्हा ती कंपनी आयपीओच्या पैशातून ते कर्ज फेडू शकते
किंवा कंपनीतील आधीच्या गुंतवणूकदारांना बाहेर पडायचे असेल तेव्हा नवीन गुंतवणूकदारांसाठी आयपीओ येतो, अशी अनेक कारणे आयपीओ आणायची करणे असू शकतात

एलआयसीचा आयपीओ बाजरात येण्याचे कारण केंद्र सरकारच्या दीपम विभागाचे संचालक राहुल जैन यांनी दिले आहे. ते म्हणाले, एलआयसीमध्ये कॉर्पोरेट प्रशासन आणणे गरजेचे आहे. त्यांचे असे मत आहे की, कंपनीचे खरे मूल्य बाजारात उतरल्यावर कळेल, त्यामुळे शेअर बाजारापासून एलआयसी कंपनी सुरवात करणार आहे. एलआयसीचा आयपीओ बाजरात आल्यानंतर एलआयसी भारताची सर्वात मोठी पाचवी लिस्टेड कंपनी बनेल. रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी नंतर आता एलआयसीचा नंबर लागणार आहे.

हे ही वाचा:

Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

जय जय महाराष्ट्र माझा…

चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे

याआधी सरकार एलआयसीचे पाच टक्क्यापर्यंत आपले स्टेक विकणार होते, मात्र आता ३.५ टक्के स्टेक कंपनी विकणार आहे. या आयपीओतून २१ हजार करोडचा निधी उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये कंपनी २२ कोटी १३ लाख शेअर्स विकणार आहे. ह्या एलआयसीच्या आयपीओची ४ मे पासून सुरवात होणार असून ९ मे शेवटची तारीख असणार आहे. ९०२ ते ९४९ रुपये या दरम्यान एलआयसी आयपीओचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओत एका लॉटमध्ये १५ शेअर असणार आहेत.

त्याशिवाय महत्वाचं म्हणजे एलआयसीने पॉलिसीधारकांना आणि विक्रेत्यांना डिस्काउंट दिला आहे. पॉलिसीधाराकांना प्रति शेअरमध्ये ६० रुपयांचा तर रिटेल विक्रेत्यांना ४५ रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार असून याचा पॉलिसीधाराकांना व विक्रेत्यांना फायदाच होणार आहे. गुंतवणूकदार एका लॉट पासून ते १४ लॉट पर्यंत म्हणजे २१० शेअर्स खरेदी करू शकतात. डिस्काउंट मिळणार म्हणून आतापर्यंत १ कोटी २१ लाख पॉलिसीधारकांनी डिमेट खाती उघडली आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसह सगळेच एलआयसी आयपीओसाठी उत्सुक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा