29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरविशेषजय जय महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा…

Related

काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा…..

हे गाणं कानावर पडलं की आपला उर अभिमानाने भरून येतो. आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. राज्यभरात या दिवशी मोठा उत्साह असतो. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यामागे बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली?

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आताचा भारत आणि तेव्हाचा भारत वेगळा होता. राज्यांची भौगोलिक स्थिती वेगळी होती. पण कालांतराने ही राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि भारतातील अनेक नवीन राज्य निर्माण झाली. भारतातील जवळजवळ सर्व राज्य दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली म्हणून या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात (बॉम्बे) विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक अधिक राहत होते. त्याचवेळी या दोन्ही भाषिक लोकांना आपापले वेगळे राज्य हवे होते आणि या मागणीला जोर आला. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते तर मराठी भाषिकांना त्यांचे राज्य हवे होते.

अनेक राज्य राज्य पुनर्रचना कायदा १९५६ अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. मल्याळम भाषिकांना केरळ, तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. तर तमिळ भाषिकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलनं सुरू झाली. गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. तर त्याचवेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते.

दरम्यान, या दोन राज्यांमध्ये मुंबईवरून भांडण सुरू झाले. महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. त्याचवेळी मुंबईच्या प्रगतीत आपला जास्त हात असल्याचे गुजराती लोक म्हणाले. त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा असं त्यांना वाटत होत. अखेर १ मे १९६० रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग बनली. तर कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातमध्ये सामील झाले. मराठवाड्याचा भाग महाराष्ट्राचा भाग बनला.

हे ही वाचा:

चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे

अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

१ मे ठरणार भाषण दिवस

फलंदाजीतला मोहिनी अवतार!!

गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महाराष्ट्रात आली या दोन्ही राज्यांची वाटचाल १९६० नंतर सुरू होऊन सध्या ती भारतातील सर्वांत विकसित अशी राज्ये आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यात तब्बल १०६ जणांनी बलिदान दिले.

महाराष्ट्राचं योगदान

महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक समृध्द आणि विकसित असे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. भारत सरकारच्या तिजोरीत जीएसटीच्या स्वरूपात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कर हा महाराष्ट्र राज्य जमा करतो. देशात शेती, औद्योगिक क्षेत्र, तंत्रज्ञान या क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांची, कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत.

आशियातील सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची आहे. देशातील सर्वात मोठे वीजजाळे हे महाराष्ट्रात आहे. भारतातील पहिली सूतगिरणी, पहिला अणुप्रकल्प, पहिले पोस्ट ऑफिस, अशिया खंडातील पहिले स्टॉक एक्सचेंज महाराष्ट्रात आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, भारताची राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, चित्रतपस्वी दादासाहेब फाळके, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी अशी अनेक अनमोल रत्न महाराष्ट्राने भारताला आणि जगाला दिली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा