30 C
Mumbai
Wednesday, April 15, 2026
घरबिजनेस२०२५-२६ मध्ये भारतात मर्सिडीज-बेंझच्या १९,३६३ गाड्यांची विक्री

२०२५-२६ मध्ये भारतात मर्सिडीज-बेंझच्या १९,३६३ गाड्यांची विक्री

आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम

Google News Follow

Related

जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने जाहीर केले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने एकूण १९,३६३ गाड्यांची विक्री करत आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षातील १८,९२८ युनिट्सच्या तुलनेत ही २.२९ टक्क्यांनी अधिक आहे. या वाढीमागे टॉप-एंड आणि कोर लक्झरी सेगमेंटमधील मजबूत मागणी कारणीभूत ठरली. जानेवारी-मार्च २०२६ या तिमाहीतही कंपनीने ७.४५ टक्के वाढ नोंदवली असून या कालावधीत ५,१३१ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ४,७७५ युनिट्सची विक्री झाली होती.

कंपनीच्या मते, मजबूत प्रॉडक्ट पोर्टफोलिओ, नेटवर्क अपग्रेड आणि सुधारलेला ग्राहक अनुभव हे चांगल्या कामगिरीमागील मुख्य घटक आहेत. उच्च श्रेणीतील लक्झरी सेगमेंटमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १६ टक्के आणि मार्च तिमाहीत २५ टक्क्यांची वाढ झाली. या सेगमेंटमध्ये एस-क्लास, मर्सिडीज-मेबॅक रेंज, EQS एसयूव्ही आणि AMG सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सेगमेंटचा कंपनीच्या एकूण विक्रीत २७ टक्के वाटा आहे. या मॉडेल्ससाठी सध्या चार महिन्यांपासून एक वर्षापर्यंत वेटिंग पीरियड आहे, विशेषतः AMG G63 सारख्या मॉडेलसाठी. कंपनीचा ‘कोर’ सेगमेंट, ज्यामध्ये C-क्लास, E-क्लास LWB सेडान आणि GLC व GLE एसयूव्हींचा समावेश आहे, यानेही विक्रीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. लाँग-व्हीलबेस E-क्लास ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी कार ठरली असून तिची मागणी सातत्याने मजबूत आहे.

मात्र, एंट्री-लेव्हल लक्झरी सेगमेंटमध्ये 18 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामागे कमी किमतीच्या पर्यायांमुळे वाढती स्पर्धा आणि बाजारातील ऑफर्स हे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, केवळ विक्रीचा आकडा वाढवण्याऐवजी दीर्घकालीन ब्रँड स्ट्रॅटेजीनुसार फीचर-रिच प्रॉडक्ट्सवर भर दिला जात आहे.

हे ही वाचा:

नमाज पठण, मांसाहारी जेवण, देवांची थट्टा… नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद!

पुडुचेरी निवडणुक: साडीतल्या ‘नीला’ रोबोटकडून मतदारांचे स्वागत

इस्रायलकडून हिजबुल्लाह प्रमुखाच्या सचिवाचा खात्मा

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री कतार दौऱ्यावर

इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही सातत्याने वाढत असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टॉप-एंड लक्झरी सेगमेंटमध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा २० टक्के राहिला. १.४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत ८५ टक्क्यांची वाढ झाली असून यात EQS एसयूव्ही आणि EQS मेबॅक एसयूव्हीचा समावेश आहे. मर्सिडीज-बेंझ इंडिया २४ एप्रिल रोजी CLA इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार असून, देशातील सॉफ्टवेअर-डिफाइन्ड वाहनांच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

नेटवर्क विस्ताराच्या दृष्टीने कंपनी २०२६ मध्ये ‘गो टू कस्टमर’ धोरणांतर्गत २० हून अधिक नवीन लक्झरी आउटलेट्स सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये विशाखापट्टणम आणि वाराणसीसारख्या नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश केला जाणार आहे, तर बेंगळुरू, मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि गोवा या विद्यमान बाजारपेठांमध्ये उपस्थिती अधिक मजबूत केली जाईल. या विस्तारासाठी पुढील दोन वर्षांत फ्रँचायझी पार्टनर्सकडून ४५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असून, अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक अनुभव अधिक सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा