28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरबिजनेसनेपाळच्या महापुराचा बँकिंग व्यवस्थेलाही मोठा फटका

नेपाळच्या महापुराचा बँकिंग व्यवस्थेलाही मोठा फटका

११ बँकांच्या १७ शाखा उद्ध्वस्त

Google News Follow

Related

भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळच्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान झाले आहे. पुराच्या तडाख्यात ११ व्यावसायिक बँकांच्या १७ शाखा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या शाखांशी संबंधित तब्बल ७३ हजार २७५ बचत खाती आणि २ हजार १२५ कर्ज खाती आहेत. या शाखांमध्ये ग्राहकांच्या सुमारे ४३.५ अब्ज नेपाळी रुपयांच्या ठेवी, तर २४.२ अब्ज नेपाळी रुपयांचे कर्ज नोंदवलेले होते.

मात्र, ४३.५ अब्ज रुपयांची संपूर्ण रक्कम पुरात वाहून गेली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. ही रक्कम संबंधित शाखांमधील ग्राहकांच्या एकूण ठेवींची आहे. प्रत्यक्षात किती रोख रक्कम, सोने-चांदी, दागिने, कागदपत्रे आणि इतर मालमत्ता पुरात वाहून गेली, याचा अंतिम अंदाज अद्याप समोर आलेला नाही. बँका सध्या प्रत्यक्ष नुकसानीचा तपशील गोळा करत आहेत.
हे ही वाचा:
‘भारत बोलतो तेव्हा जग कान देऊन ऐकतं’

अमेरिकेच्या जॉब मार्केटमध्ये ‘नो हायर, नो फायर’

मुंबई एटीएसच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट!

NEET-PG परीक्षा सुरू असताना १० वेळा बत्ती गूल!

रसुवाच्या तिमुरे आणि स्याफ्रुबेंसी भागातील बँकांच्या शाखांसोबत त्यांच्या तिजोऱ्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. यातील एका तिजोरीत सुमारे १२.५ कोटी नेपाळी रुपये रोख असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रिशूली नदीतून वाहून आलेली तिजोरी फोडून पैसे काढल्याच्या आरोपावरून पोलिसांनी २९ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ९२ लाख ६८ हजार ५०५ नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीचा मानवी फटकाही गंभीर आहे. ३५ बँक कर्मचारी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने सर्व वित्तीय संस्थांकडून कर्मचारी, रोख रक्कम, मालमत्ता आणि इतर नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यामुळे पुरामुळे नेपाळच्या बँकिंग क्षेत्राला झालेल्या वास्तविक आर्थिक नुकसानीचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा