गेल्या ३० वर्षांपासून भारताची पहिली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि पहिले व सर्वांत मोठे फिनटेक (वित्तीय तंत्रज्ञान) असणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया) भारताच्या भांडवली बाजाराची पायाभरणी केली आहे. ‘एनएसई’ने सन १९९४मध्ये पूर्णपणे स्वयंचलित ‘स्क्रीन’वर आधारित ‘ऍनॉनिमस ऑर्डर मॅचिंग सिस्टीम’चा यशस्वीपणे श्रीगणेशा केला आणि तेव्हा नवीनच असलेल्या आयटी विश्वात भारताची विश्वासार्हता प्रस्थापित होण्यास मदत झाली. ‘एनएसई’च्या उल्लेखनीय यशानंतरच आंतरराष्ट्रीय बाजारांनी ‘ऑटोमेशन’ (स्वयंचलित) पद्धतीचा अवलंब केला. ‘एनएसई’ हा भारताचा पहिला डिजिटल सार्वजनिक प्रकल्प म्हणून उदयास आल्याने भारताच्या आयटी क्रांतीचा मार्ग प्रशस्त झाला. एनएसई आजही भारतातील पहिले ‘फिनटेक’ (वित्तीय तंत्रज्ञान) आहे.
अवघ्या काही दिवसांत २० अब्ज डॉलरची ‘ऑर्डर’ आणि सुमारे ३० कोटी व्यवहारांची उलाढाल करणारा ‘एनएसई’ जगातील सर्वांत मोठा शेअर बाजार म्हणून उदयास आला आहे. गेल्या ३० वर्षांपासून ‘एनएसई’ने भारताच्या शेअर बाजाराची दिशाच बदलली असून याचा सर्वांत मोठा लाभार्थी हा भारतीय गुंतवणूकदार ठरला आहे.
‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंज’च्या आकडेवारीनुसार, सन २०२४मध्ये व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत ‘एनएसई’ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा इक्विटी शेअर बाजार ठरला असून सलग सहाव्या वर्षी सर्वांत मोठा ‘डेरिएटिव्ह’ शेअर बाजार ठरला आहे.
‘एनएसई’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक, विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असणारे आशीषकुमार चौहान ‘एनएसई’ची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. गुंतवणूकदार, कंपन्या आणि मध्यस्थांना सक्षम बनवतानाच निष्पक्षता, कार्यक्षमता आणि पारदर्शक कारभारासाठी नेहमीच कटिबद्ध राहण्याबाबत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.
शेअर बाजाराचे लोकशाहीकरण
सन १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला ‘एनएसई’ची झालेली स्थापना म्हणजे भारतातील वित्तीय बाजारपेठेतील आव्हानांना दिलेला थेट प्रतिसाद होता. सन १९९२च्या हर्षद मेहता घोटाळ्याने या प्रणालीतील अकार्यक्षमता, पारदर्शकतेचा अभाव आणि बाजारात हातचलाखी करण्यास असलेला वाव उघडकीस आणला. त्यामुळे एका मजबूत, आधुनिक शेअर बाजाराची आवश्यकता अधोरेखित झाली. डॉ. आर. एच. पाटील आणि एस. एस. नाडकर्णी यांसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रव्यापी, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित ट्रेडिंग सिस्टीम सुरू करण्याची संकल्पना मांडण्यात आली. यात मॅन्युअल ट्रेडिंगमुळे होणाऱ्या अकार्यक्षमतेला स्थान नव्हते. तसेच, व्यवहार करणाऱ्याचे भौगोलिक स्थान कुठलेही असो, अशा सर्व प्रकारच्या शेअर बाजारातील सहभागींना यात सहभागी होता यावे, याचा मार्ग सुनिश्चित करण्यात आला. परिणामी, बाजाराप्रति एक विश्वासाचे नाते निर्माण झाले.
किरकोळ गुंतवणूकदारांना सक्षम बनवून, संस्थात्मक सहभागाला प्रोत्साहन देऊन आणि शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी करून ‘एनएसई’ने भारतातील वित्तीय बाजारपेठांचे लोकशाहीकरण केले आहे. बाजारांची एकात्मता टिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा अंमलात आणण्यासाठी ‘एनएसई’ने नियामक आणि सरकारी संस्थांशी सहकार्य केले आहे. कठोर जोखीम व्यवस्थापन पद्धतींसह ‘एनएसई’ने आखलेली नियामक चौकट एक जागतिक ‘बेंचमार्क’ ठरली आहे. ‘एनएसई’ने अत्याधुनिक तंत्रज्ञान, नियामक अनुपालन आणि गुंतवणूकदारकेंद्रित धोरणांचा अवलंब केला आहे.
भारताच्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंब – ४५ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी भांडवली बाजारपेठ
भारताच्या विकासगंगेत लवचिकपणा आणि महत्त्वाकांक्षेचा संगम आढळतो आणि आपल्या बाजारपेठांनी या प्रवासाचे प्रतिबिंब दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, सन २०२५ मध्ये भारत जपानला मागे टाकून चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. तर भारतीय शेअर बाजार जागतिक स्तरावर अमेरिका, चीन (हाँगकाँगसह) आणि जपानच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे.
गेल्या ३० वर्षांत ‘एनएसई’मध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल ११० पटींनी वाढले आहे. २,५०० ते २०,००० अमेरिकी डॉलरच्या दरडोई उत्पन्नाच्या श्रेणीतील इतर कोणत्याही देशातील बाजारपेठेचा आकार तुलनात्मकदृष्ट्या इतका नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे, आज भारताचे शेअर बाजारातील भांडवल बँकिंग क्षेत्राच्या आकाराच्या जवळपास १.६ पट आहे. भारताच्या आर्थिक विस्तारात भांडवली बाजारांची वाढती भूमिकाच यातून अधोरेखित होते. सर्व भागधारकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच भांडवली बाजारपेठेत भारत उच्च स्थान गाठू शकला आहे.
११ कोटींहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास
एनएसईने निर्माण केलेल्या विश्वासामुळे ११.५ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा टप्पा गाठला आहे. ज्यांची २२ कोटींहून अधिक खाती आहेत. अभिमानास्पद बाब म्हणजे एनएसईचे गुंतवणूकदार भारतातील ९९.९ टक्के पिनकोडमधील आहे. केवळ २८ पिनकोडमध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदार नाहीत, मात्र त्यातील बहुतेक अनिवासी भारतीय क्षेत्रे आहेत.
पाच वर्षांपूर्वी १४ घरांपैकी एका घराचा शेअर बाजाराशी थेट संबंध होता. हे प्रमाण आता बदलले आहे. आता पाचपैकी एक घर शेअर बाजाराशी थेट जोडलेले आहे. दिब्रुगड असो किंवा सालेम, देशातील सर्व भागातील गुंतवणूकदार बाजारपेठेवरील विश्वासामुळेच त्यांचे कष्टाचे पैसे बाजारात गुंतवत आहेत.
एकूण गुंतवणूकदारांपैकी एक चतुर्थांश महिला गुंतवणूकदार आहेत तर, ‘एनएसई’ नोंदणीकृत गुंतवणूकदारांचे सरासरी वय मार्च २०२५ पर्यंत ३२ वर्षे आहे. हेच वय मार्च २०१९पर्यंत ३८ वर्षे होते. आज नोंदणीकृत गुंतवणूकदारांपैकी जवळजवळ ४० टक्के गुंतवणूकदार ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि आर्थिक वर्ष २५ मध्ये जोडलेल्या नवीन गुंतवणूकदारांपैकी ५३ टक्के गुंतवणूकदार ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या श्रेणीत येतात.
बंगाल – आर्थिक प्रगतीचे स्थान
पश्चिम बंगाल हा भारताच्या अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या बाबतीत पश्चिम बंगाल भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. येथे ६५ लाखांहून अधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत. आर्थिक वर्ष २०१५ मध्ये हीच गुंतवणूकदारांची संख्या सुमारे २० लाख होती. म्हणजे १० वर्षांत या गुंतवणूकदारांमध्ये तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. ही आकडेवारी देशाच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात बंगालचे महत्त्व अधोरेखित करते.
हे ही वाचा:
एसआयपी इनफ्लो मे मध्ये ऑल-टाइम हाय
पळून गेलेले तीन बांगलादेशी बंगालमधून अटक
बेंगळुरू चेंगराचेंगरी : एक कोटी रुपयांचा नुकसानभरपाईची मागणी
स्वित्झर्लंडमध्ये पियुष गोयल यांची प्रमुख उद्योगपतींची भेट
सामायिक यश
हे यश केवळ ‘एनएसई’चे नाही. गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, नियामक, सरकार आणि ब्रोकर्ससह इतरांचे हे सामायिक यश आहे. भारतीय बाजारपेठेची आणि ‘एनएसई’ची वाढ केवळ सक्षम परिसंस्थेमुळेच शक्य झाली आहे. आमचे प्रत्येक भागधारक कोट्यवधी लोकांना बाजारात सहभागी होण्यास आणि भारताच्या विकासगंगेत भागधारक होण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
भांडवल उभारणीत जागतिक आघाडीवर
‘राष्ट्रीय शेअर बाजारा’ने सन २०२४ मध्ये मेनबोर्ड (९०) आणि एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) (१७८) वर २६८ यशस्वी आयपीओंद्वारे १.६७ लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. कोणत्याही कॅलेंडर वर्षात नोंदवलेल्या आयपीओंची ही सर्वाधिक संख्या आहे. भारतातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचे हे द्योतक आहे. सन २०२४ मध्ये जागतिक स्तरावर एकूण ११४५ आयपीओ जाहीर करण्यात आले. सन २०२३मध्ये हीच संख्या १,२७१ होती. ‘एनएसई’ने २६८ कंपन्यांना आयपीओद्वारे सुमारे १.६७ लाख कोटी रुपये (१९.५ अब्ज अमेरिकी डॉलर) एकूण निधी उभारण्यास मदत केली. यामध्ये ‘मेन बोर्ड’ आणि ‘एसएमई’ अशा दोन्ही उद्योगांचा समावेश आहे. ९० कंपन्या (आरईआयटीएस, इनव्हिट्स आणि एफपीओ वगळता) ‘मेन बोर्ड’वर सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांनी १.५९ लाख कोटी रुपयांपेक्षा (१८.५७ अब्ज डॉलर) अधिक भांडवल उभारले आहे, तर १७८ ‘एसएमईं’नी एकत्रितपणे सुमारे ७,३४९ कोटी रुपयांचे भांडवल (०.८६ अब्ज डॉलर) उभारले आहेत.
गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे सूचीबद्ध कंपन्यांना शाश्वत विकास मार्गासाठी आणि वाढीव आर्थिक उलाढालींसाठी भांडवल उभारण्यास आणि तो वापरण्यास मदत मिळते. यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर घातली जातेच, शिवाय, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासही चालना मिळते. त्यामुळे भारताच्या एकूण विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते.
एनएसईच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे
स्क्रीन-आधारित ट्रेडिंग (१९९४):
‘एनएसई’ने पारंपरिक ‘ओपन-आउटक्राय सिस्टीम’च्या जागी पूर्णपणे स्वयंचलित, ‘इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मॅचिंग’चा पाया रचला. परिणामी, शेअर बाजारात वेग, निष्पक्षता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुनिश्चित झाली.
एनएसई क्लिअरिंग लिमिटेड (एनसीएल)ची स्थापना (१९९६):
‘एनसीएल’तर्फे क्लिअरिंग आणि सेटलमेंटची सेवा प्रदान केली जाते. प्रतिपक्षाच्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासह मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणालींद्वारे बाजारात एकात्मता राखली जाते.
निफ्टी ५० इंडेक्सची स्थापना (१९९६)
सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री आशीषकुमार चौहान यांची ही संकल्पना. निफ्टी५०मध्ये विविध क्षेत्रांमधील ५० मोठ्या भांडवली आणि तरल समभागांचे प्रतिनिधित्व केले जाते. आज, जागतिक स्तरावर सर्वाधिक लक्ष ठेवल्या गेलेल्या निर्देशांकांपैकी हा एक निर्देशांक असून त्याला भारताचा ‘स्टॉक ऑफ द नेशन’ असेही म्हटले जाते.
डिमटेरिअलायझेन ऑफ शेअर्स (१९९६) :
एनएसईने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड(एनएसडीएल)च्या प्रोत्साहनासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे कागदविरहित व्यवहारांमध्ये रूपांतर झाले आणि कागदी शेअर सर्टिफिकेटबाबत असणाऱ्या जोखीम दूर झाल्या.
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट (२०००) :
‘एनएसई’ने इंडेक्स फ्युचर्ससह इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज सादर केले. त्यानंतर सन २००१मध्ये इंडेक्स ऑप्शन्स सादर केले. परिणामी, जागतिक डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेत भारत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आला. आज, ‘एनएसई’च्या माध्यमातून भांडवल, चलन, व्याजदर आणि कमोडिटी बाजारात डेरिव्हेटिव्ह्जचे करार केले जातात.
एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ), करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इंटरेस्ट रेट फ्युचर्स आणि कमोडिटीजचा समावेश करण्यासाठी ‘एनएसई’ने वैविध्यपूर्ण योजना आणल्या. त्यामुळे एक व्यापक वित्तीय बाजारपेठ म्हणून ‘एनएसई’चे स्थान बळकट झाले.
गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि गुंतवणूकदारांची जागरूकता
मार्च २०२५पर्यंत ‘एनएसई’च्या ‘इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’मध्ये दोन लाख ४५ हजार ९२७ कोटी रुपयांहून अधिक निधी असून ‘कोअर सेटलमेंट गॅरंटी फंड’मध्ये १२,०८३११,६७४ कोटींचा निधी आहे. ‘एनएसई’तर्फे विविध स्तरांवर गुंतवणूकदारांच्या सुरक्षेला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचे हे द्योतक आहे. गुंतवणूकदारांच्या जागरूकतेलाही ‘एनएसई’कडून प्राधान्य दिले जाते. यासाठी तब्बल १४,६७९१३,२०३ कार्यक्रम घेण्यात आले. आर्थिक वर्ष २०२५ म्हणजेच एप्रिल ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत या कार्यक्रमांच्या माध्यमातून ७.२४ लाख गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता करण्यात आली.
राज्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी ‘एनएसई’ने उत्तराखंड, मेघालय, छत्तीसगड, आसाम आणि गोवा या राज्य सरकारांसोबत आणि वाराणसी जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करार केले आहेत. गिग कामगारांसाठी विशेषतः महिला गिग कामगारांमध्ये आर्थिक जागरूकता वाढविण्यासाठी ‘एनएसई’ने झोमॅटो आणि स्विगीसोबत सामंजस्य करार केले आहेत.
विकसित भारतासाठी उत्प्रेरक
साधी सरळ सुरुवात ते जागतिक स्तरावर अमीट छाप असा ‘एनएसई’चा ३० वर्षांचा प्रवास म्हणजे भारताच्या आर्थिक उत्क्रांतीचा पुरावा आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी केलेले वक्तव्यच उद्धृत करायचे म्हणजे ‘भांडवलाशिवाय विकसित भारत नाही.’ भारताच्या विकासासाठी, देशाला भांडवलाची आवश्यकता आहे. आर्थिक वाढ, भांडवल निर्मिती, संपत्ती निर्मिती आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाचे सूत्रधार होण्यासाठी ‘एनएसई’ दृढपणे कटीबद्ध आहे. ‘एनएसई’ची चाळिशीकडे वाटचाल सुरू असताना जागतिक स्तरावर भारतानेही आर्थिक उदयाच्या दिशेने कूच केली आहे. तांत्रिक कौशल्य, उत्कृष्ट नियामकता आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी अढळ वचनबद्धतेसह, भारताच्या भांडवल बाजारवाढीची पुढील पायरी गाठण्यास उत्तेजन देण्यासाठी ‘एनएसई’ सज्ज आहे. लाखो लोकांना देशाच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात सहभागी करण्यासाठी ‘एनएसई’ सक्षम बनवत असून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आर्थिक महासत्ता म्हणून भारताचे स्थान बळकट करत आहे.
