25 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरबिजनेसराष्ट्रीय शेअर बाजारात २०२५मध्ये निफ्टी भक्कम, आयपीओ बाजारात महाराष्ट्र अव्वल

राष्ट्रीय शेअर बाजारात २०२५मध्ये निफ्टी भक्कम, आयपीओ बाजारात महाराष्ट्र अव्वल

अहवालातून दिसली चमकदार कामगिरी

Google News Follow

Related

२०२५ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली. या वर्षात प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली असली, तरी स्मॉलकॅप व मायक्रोकॅप निर्देशांकांवर दबाव कायम राहिला. निफ्टी ५० ने वर्षअखेरीस १०.५ टक्क्यांची वाढ नोंदवली, तर डॉलर निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने जागतिक बाजारातील समीकरणे बदलली.

२०२४ आणि २०२५ या दोन वर्षांची तुलना केली तर एनएसईच्या प्रगतीत दमदार वृद्धी झाली आहे. एनएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांची संख्या २०२४ला २६४१ इतकी होती ती २०२५मध्ये २८९८ इतकी झाली. म्हणजे गेल्या वर्षी सूचीबद्ध कंपन्यांची संख्या २५८ने वाढली. या कंपन्यांच्या बाजार भांडवलातही वृद्धी झालेली आहे. ती ४३९ लाख कोटींहून ४७४ लाख कोटी इतकी वाढली आहे. हा बदल ७.९ टक्के इतका आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये इक्विटी व कर्ज बाजारातून एकूण ₹ १९.६४ लाख कोटींची निधी उभारणी झाली आहे, जी २०२४ च्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे. मात्र आयपीओ संख्येत घट झाली असली, तरी उभारलेल्या निधीत वाढ झाली आहे, हे विशेष मानले जात आहे.

हे ही वाचा:

साबरमती काठी मोदींसह जर्मन चान्सलर मर्झ यांनी उडवले पतंग

इस्रोची पीएसएलव्ही सी६२ मोहीम फसली; १६ उपग्रह नष्ट

भारत अमेरिकेवर फारसा अवलंबून नाही; इतर पर्याय उपलब्ध

इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप?

याच दोन वर्षांतील आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेकडे लक्ष वेधले तर लक्षात येते की, २०२४ला ही रक्कम १ लाख ६६ हजार कोटी इतकी होती ती २०२५ला १ लाख ७८ हजार कोटी इतकी झालेली आहे. मेनबोर्ड आयपीएओदेखील वाढले आहेत. २०२४ला ते ९० होते तर २०२५ला त्यांची संख्या १०३ होती. त्यातून उभारलेली रक्कम २०२४ला १ लाख ५९ हजार कोटी होती तर २०२५ला ती १ लाख ७२ हजार कोटी होती. यात सर्वात मोठा आयपीओ हा ह्यून्डाईचा (२७ हजार ८५९ कोटी) होता.

एनएसईच्या इक्विटी निर्देशांकाचे मूल्य निफ्टी ५० २३ हजार ६४५ इतके २०२४मध्ये होते ते २०२५मध्ये २६ हजार १३० इतके झाले. याचा अर्थ यात १०.५ टक्के इतकी वृद्धी झाली. निफ्टी ५० (डॉलर्स), निफ्टी नेक्स्ट, निफ्टी ५००, निफ्टी मिडकॅप १५० या सगळ्यातच चांगली वाढ झालेली आहे, असा हा अहवाल सांगतो.

निफ्टीत मजबुती, पण स्मॉलकॅपमध्ये घसरण

२०२५ मध्ये निफ्टी 50 २६,१३० या पातळीवर बंद झाला, जो २०२४ च्या तुलनेत २,४८५ पॉइंट्सने वाढलेला आहे. मिडकॅप निर्देशांकात मर्यादित वाढ झाली, मात्र निफ्टी स्मॉलकॅप 250 मध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली.

व्याजदरांमध्ये घट; भारतात बाँड यिल्ड खाली

भारतामध्ये १-वर्ष, ५-वर्ष आणि १०-वर्ष सरकारी बाँड यिल्डमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विशेषतः १-वर्ष सरकारी यिल्डमध्ये १०७ बेसिस पॉइंट्सची घसरण झाली, ज्याचा सकारात्मक परिणाम कर्ज बाजारावर झाला आहे.

आयपीओ आणि प्राथमिक बाजार

२०२५ मध्ये एनएसईवर  २२० आयपीओ झाले, जे २०२४ च्या तुलनेत कमी असले तरी, त्यातून उभारलेला निधी वाढून ₹ १.७८ लाख कोटींवर पोहोचला. मेनबोर्ड आयपीओ मध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक ही आघाडीची राज्ये ठरली.

गुंतवणूकदारांची संख्या विक्रमी

२०२५ अखेरपर्यंत देशातील नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या १२.५ कोटींवर गेली असून, एका वर्षात १.६ कोटी नवे गुंतवणूकदार बाजारात सहभागी झाले. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतून सर्वाधिक नवीन गुंतवणूकदार नोंदवले गेले.

 

प्रमुख निर्देशांक

निफ्टी 50: +१०.५% (२३,६४५ → २६,१३०)

निफ्टी मिडकॅप 150: +५.४%

निफ्टी स्मॉलकॅप 250: -६ %

डॉलर निर्देशांक: -९.४%

बाजार भांडवल

एनएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप:
₹ ४३९ लाख कोटी → ₹ ४७४ लाख कोटी (+७.९%)

बाजार भांडवल / जीडीपी : १३८ % → १३५%

 बाँड यिल्ड (भारत)

१०-वर्ष: ६.८% → ६.६%

५-वर्ष: ६.७% → ६.३%

१-वर्ष: ६.७% → ५.६%

आयपीओ/ प्राथमिक बाजार

एकूण आयपीओ  (२०२५): २२०

आयपीओमधून उभारलेला निधी:  १.७८ लाख कोटी रु.

मेनबोर्ड आयपीओ : १०३

एसएमई आयपीओ : ११७

🌍 आयपीओमध्ये आघाडीची राज्ये (मेनबोर्ड – २०२५)

महाराष्ट्र:  ४६,५१२ कोटी रु.

दिल्ली : ₹ ४१,९२३ कोटी रु.

कर्नाटक: ₹ ३६, २९३ कोटी

 गुंतवणूकदार

एकूण नोंदणीकृत गुंतवणूकदार: १२.५ कोटी

२०२५ मध्ये नवे गुंतवणूकदार: १.६ कोटी

सर्वाधिक नवे गुंतवणूकदार: उत्तर प्रदेश, महाराष्ट्र

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा