27 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरबिजनेसइंदिरा गांधींच्या बातमीचा तो फोटो बनावट, पण बातमी खरी!

इंदिरा गांधींच्या बातमीचा तो फोटो बनावट, पण बातमी खरी!

सोन खरेदी न करण्याचे केले होते आवाहन

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

इंदिरा गांधी यांनी देखील १९६७मध्ये सोने खरेदी करू नका, राष्ट्रीय शिस्त पाळा, असे आवाहन केल्याचे हिंदू या वृत्तपत्रातील कात्रण सध्या एक्स आणि व्हॉट्सअपवर फिरत आहे, मात्र ते खरे नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू वर्तमानपत्रानेही हे आपले कात्रण नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्यात इंदिरा गांधी यांनी केलेले आवाहन मात्र खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंदू या वर्तमानपत्राचे सुरेश नंबथ यांनी हे स्पष्ट केले की, हे बनावट पहिले पान आहे आणि त्याचा त्यांच्या वृत्तपत्राशी काहीही संबंध नाही. त्यांनी लोकांना ते पुढे शेअर न करण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

श्रीनगरमध्ये ‘लष्कर’ची पोस्टर्स, शस्त्रे, दारुगोळ्यासह दोन जण अटकेत

सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी

इराणच्या आयआरजीसीची माहिती द्या, १.५ कोटी डॉलर कमवा!

अंधेरीत सापडले ४ कोटींचे ड्रग्ज

पण इंदिरा गांधींनी खरोखर लोकांना सोने खरेदी करू नका असे सांगितले होते का? तर हो. इंदिरा गांधी यांनी १९६७ मध्ये लोकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते, असे कर्नाटक भाजपा नेते आर. अशोक यांनी सांगितले.

त्या काळातील परिस्थिती महत्त्वाची होती. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर आर्थिक संकट, दुष्काळ आणि अन्नटंचाई, विदेशी चलनसाठ्यात मोठी घट, १९६६ मध्ये रुपयाचे ५७% अवमूल्यन झाले होते. त्या काळात सोने आयात करण्यातून विदेशी चलनावर मोठा ताण येत होता. त्यामुळे लोकांनी सोने खरेदी कमी करावी, हे आर्थिक धोरणाचा भाग होते.

भारतात अशा प्रकारच्या आवाहनांची परंपरा

१९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरू यांनी लोकांना सोने दान करण्याचे आवाहन केले होते. १९९१ मध्ये भारताने आर्थिक संकटात सोने गहाण ठेवले होते. २०१३ मध्ये पी. चिदंबरम यांनीही लोकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा