26 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरबिजनेसमुद्रा योजनेंतर्गत ४०.८२ कोटी लोकांना मिळाली २३. २ लाख कोटींची कर्जे

मुद्रा योजनेंतर्गत ४०.८२ कोटी लोकांना मिळाली २३. २ लाख कोटींची कर्जे

पंतप्रधान मुद्रा योजनेला झाली आठ वर्षे पूर्ण . मुद्रा योजनेतून लघु, माध्यम उद्योजकांना मिळाला मोठा आधार

Google News Follow

Related

पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांकडून गेल्या आठ वर्षांत ४०. ८२  कोटी लाभार्थ्यांना २३.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा योजना होऊन आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अष्ट वर्षपुर्तीनिमित्त अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मुर्द्र योजनेच्या यशकथेची आकडेवारी साहिर केली आहे.

गेल्या आठ वर्षांत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ४०. ८२  कोटी लाभार्थ्यांना २३.२ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. देशाच्या नवउद्योजकांना कर्जाची सहज उपलब्धता यामुळे नावीन्य आणि दरडोई उत्पन्नात सतत वाढ होत असल्याचे यावरून दिसून असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’मध्ये एमएसएमईचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विकासामुळे देशांतर्गत वापरासाठी तसेच निर्यातीसाठी उत्पादनात वाढ झाली आहे. एमएसएमईंना पीएमएमवाय योजनेतून मोठा पाठिंबा मिळाला असल्याबद्दल अर्थमंत्री सितारमण यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. यामध्ये सरकारकडून काहीही तारण न ठेवता व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने छोटे व्यापारी आणि बिगर कॉर्पोरेट्सना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएमएमवाय अंतर्गत कर्ज बँका, वित्तीय संस्था जसे की एनबीएफसी आणि मायक्रोफायनान्स संस्थांद्वारे दिले जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली होती जेणेकरून या अंतर्गत देशातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय तारणमुक्त कर्ज मिळू शकेल असा उद्देश ही योजना राबवण्या मागे होता.या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली आहे.

नवीन व्यावसायिक, महिला आघाडीवर
२४ मार्च २०२३ पर्यंत दिलेल्या एकूण कर्जापैकी २१ टक्के कर्ज वितरण नवीन व्यवसायांना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ टक्के कर्ज महिला उद्योजक आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना वितरित करण्यात आले आहे.

कर्ज वितरणाचा चढता आलेख
२०१५-१६ – ३ . ४८ कोटी रु.
२०१६-१७ – ३. ९७ कोटी रु.
२०१७-१८ – ४. ८१ कोटी रु.
२०१९-२० – ५.९८ कोटी रु.
२०२१-२२ – ५.३७ कोटी रु.
२०२२-२३ – ६. ०८ कोटी रु.

एकूण कर्जांपैकी किती लोकांना कर्ज
शिशू श्रेणी :- ३३. ५४ कोटी
किशोर श्रेणी :- ५.८९ कोटी
तरुण श्रेणी :- ८१ लाख

हे ही वाचा:

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

योजनेशी संबंधित काही खास गोष्टी
कोणत्याही हमीशिवाय कर्ज घेता येते.
कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
कर्ज परतफेडीची मुदत ५ वर्षांपर्यंत वाढवता येते.
कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते,

कसे मिळवाल मुद्रा कर्ज ? कोणती कागदपत्रे आवश्यक ?
पंतप्रधान मुद्रा कर्जासाठी, तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रूफच्या स्वरूपात आवश्यक आहे.) अशी कागदपत्रे आवश्यक असतील. यासह, तुमच्या व्यवसायाचा पुरावा देण्यासाठी तुम्हाला व्यवसाय प्रमाणपत्र आणि व्यवसाय पत्ता आवश्यक असेल. यासोबतच तुम्हाला किमान दोन पासपोर्टही आवश्यक असतील. या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही mudra.org.in या वेबसाइटला भेट द्या. याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊनही कर्ज मिळवू शकता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा