29 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरबिजनेसभारतीय अर्थव्यवस्थेसमोर पाच प्रमुख आर्थिक जोखीम

भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पाच प्रमुख आर्थिक जोखीम

आरबीआय गव्हर्नरांचा इशारा

Google News Follow

Related

भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती मजबूत असली तरी भविष्यातील आर्थिक जोखमींबाबत गाफील राहू नये, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिला. नवी दिल्लीत झालेल्या पाचव्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी जागतिक आर्थिक व्यवस्थेसमोरील पाच प्रमुख जोखमींचा उल्लेख केला. यामध्ये वाढता जागतिक कर्जबोजा, मालमत्तांच्या वाढलेल्या किंमती व विशेषतः एआय क्षेत्रातील उच्च मूल्यांकन, वित्तीय क्षेत्रातील वाढता लेव्हरेज, प्रायव्हेट क्रेडिटमधील जोखीम आणि एआयमुळे वाढणारे सायबर धोके यांचा समावेश आहे.

मल्होत्रा यांनी पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईचा दबाव आणि वित्तीय अस्थिरतेची जोखीम वाढल्याचेही नमूद केले. त्यांच्या मते, आर्थिक किंवा वित्तीय संकट अचानक निर्माण होऊ शकते; मात्र त्याचे परिणाम दूर करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. त्यामुळे बँका, एनबीएफसी, वित्तीय बाजारपेठा, पेमेंट व्यवस्था आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमध्ये सर्वसमावेशक लवचिकता निर्माण करण्याची गरज आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा