29.3 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरदेश दुनियासंयुक्त अरब अमिरातीच्या उपपंतप्रधानांनी स्मितची केली विचारपूस

संयुक्त अरब अमिरातीच्या उपपंतप्रधानांनी स्मितची केली विचारपूस

Google News Follow

Related

संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांनी शनिवारी अबूधाबी येथे भारतीय फ्लायदुबई वैमानिक स्मित माछर यांची भेट घेतली. सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये केलेल्या हल्ल्यादरम्यान प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांनी मच्छर यांचे कौतुक केले.

भेटीनंतर ‘एक्स’वरील पोस्टमध्ये हमदान यांनी म्हटले की, स्मित मच्छर यांनी “धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाबद्दलची काळजी यांचा सर्वोच्च स्तर” दाखवून दिला. यूएईच्या नेतृत्वाच्या वतीने त्यांनी मच्छर यांचे कौतुक आणि आभारही व्यक्त केले. दुबईचे युवराज हमदान यांनी लिहिले की, “ते आमच्या टीमचा भाग आहेत, आमच्या राष्ट्राच्या कथेचा भाग आहेत आणि यूएई ज्या मूल्यांसाठी उभा आहे, त्याचाही ते एक भाग आहेत. यूएई ही करुणेची भूमी आहे, शांततेची भूमी आहे आणि जीवनाचा सन्मान करणारे राष्ट्र आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.”

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पाच प्रमुख आर्थिक जोखीम

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनप्रकरणी पोलिसांची कारवाई

भारतीय क्षेपणास्त्र ब्रह्मोस-आकाशची जगभरात मागणी

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

बुधवारी दुबई-तेल अवीव मार्गावरील विमानात ओमानी सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये ठेवलेल्या आपत्कालीन कुऱ्हाडीने स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेला यूएईने ‘दहशतवादी हल्ला’ असे संबोधले आहे. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मच्छर सध्या अबूधाबी येथे उपचार घेत आहेत.

दुबई-तेल अवीव विमानात नेमके काय घडले?

यूएईच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाच्या माहितीनुसार, ओमानी सहवैमानिकाने एफझेड१०७३ या विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी कॅप्टन स्मित माछर यांच्यावर विमानातील आपत्कालीन कुऱ्हाडीने हल्ला केला होता. या विमानात एकूण १७४ प्रवासी होते. हल्ल्यात जखमी होऊनही स्मित यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडून मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर प्रवासी आणि विमानातील क्रू सदस्यांनी एकत्र येत हल्लेखोराला काबूत आणले. यानंतर राखीव क्रूच्या मदतीने विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर उतरवण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉलद्वारे कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी संवाद साधला. हल्ल्याच्या वेळी त्यांनी अत्यंत वेगाने निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी माछर यांना सांगितले की, “तुम्ही काही क्षणांच्या आत अनेक निर्णय घेतले आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले.”

स्मित यांच्या धैर्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. ते म्हणाले, “आम्ही भारतीय असे लोक नाही जे जीव घेतात. आम्ही असे लोक आहोत जे जीव वाचवतात.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा