28 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरबिजनेसफोर्ड बंद होऊन देखील कर्मचाऱ्यांना 'असा' मिळणार दिलासा

फोर्ड बंद होऊन देखील कर्मचाऱ्यांना ‘असा’ मिळणार दिलासा

Google News Follow

Related

भारतात उत्पादन बंद केल्यामुळे चर्चेत असलेल्या फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आता आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. फोर्ड इंडियाच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी आपली योजना तयार केली आहे. कंपनीचे तीन कारखाने बंद झाल्यामुळे त्यांचे कर्मचारी प्रभावित झाले आहेत. कंपनीने त्यांचे चेन्नईतील दोन आणि गुजरातमधील एक कारखाना बंद करण्याचा नुकताच निर्णय घेतला होता.

९ सप्टेंबर रोजी फोर्ड इंडियाने २०२१ च्या चौथ्या तिमाहीत सानंदमधील वाहन असेंब्ली आणि २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत चेन्नईमध्ये वाहन आणि इंजिन उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, फोर्ड इंडियाने उर्वरित तीन प्लांट बंद करून सानंदमधील इंजिन प्लांटचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सानंद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नयन कटेशिया यांनी आयएएनएसला सांगितले की, “सोमवारी साणंद प्लांट व्यवस्थापनाने आमच्याशी चर्चा केली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की कंपनीच्या कारखाने बंद करण्याच्या निर्णयावर आम्हाला काही प्रश्न आहेत का?” नयन कटेशिया यांच्या मते, व्यवस्थापनाकडे कोणतेही उत्तर नव्हते आणि ते परत येतील असे सांगितले. प्रोडक्शन लाईनवर उर्वरित कारची असेंब्ली पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. इंजिन प्लांट चालू आहे.

हे ही वाचा:

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

नदीत ११ जण बुडाले, तिघांचा मृत्यू

खरी अफगाण संस्कृती दर्शवण्याचा अफगाण महिलांचा प्रयत्न

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

फोर्डची सगळ्यात मोठी चूक कुठली असेल तर ती आहे भारतीय बाजार न कळणं. त्यातही भारतीयांची गाड्यांची मानसिकता न कळणं किंवा कळूनही तिच्याकडे दुर्लक्ष करणं. भारत हा अमेरीका नाही. तिथं ग्राहक गाडीचं इंजिन, त्याची साईज अशा तांत्रिक बाबी जास्त पहातात. भारतीय ग्राहक पैशाचा विचार करतो. किंमत किती आहे, मायलेज किती देते, सेकंडहँड म्हणून विकायची ठरवलं तर कितीला जाणार अशा अनेक गोष्टींचा तो विचार करतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा