28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरदेश दुनियाशिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवलेलं ईराणला आवडलेलं दिसत नाही. कारण, तालिबानच्या अंतरिम सरकारच्या स्थापना प्रक्रियेवरच ईराणने प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. ईराणने हा आरोप केला आहे की, अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या तालिबानच्या सरकारमध्ये अफगाणिस्तानाच्या विविध भागातील जनतेचे प्रतिनिधींना स्थान देण्यात आलेलं नाही. विशेषतः अफगाणिस्तानमधील शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याची माहिती अफगाणिस्तानमधून मिळत आहे.

ईराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खातीबजादेह म्हणाले की, ही नक्कीच सर्वसमावेशक सरकार नाही आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय समुदाय आणि ईराणला आशा होती. तेहरान इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, खरं म्हणजे आपल्याला वाट पाहावी लागेल की तालिबान आंतरराष्ट्रीय मागण्यांचा किती विचार करतो.

ईराण आणि अफगाणिस्तान हे एकमेकांचे शेजारी. जवळपास ९०० किलोमीटरची अफगाण सीमा ईराणला लागून आहे. हेच नाही तर ईराणमध्ये आता जवळपास ३५ लाखांहून अधिक अफगाणी निर्वासित राहतात. तालिबानचे अत्याचार वाढले तर पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने अफगाणी नागरिक ईराणकडे वाटचाल करतील अशी भिती ईराणला आहे. हेच पाहता ईराण अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर एवढं खोलवर लक्ष्य घालत आहे. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य होतं, तेव्हासुद्धा ईराणचे तालिबानसोबतचे संबंध खूपकाही चांगले नव्हते. ईराणने तालिबानला कधीच मान्यता दिली नाही. मात्र गेल्या काही महिन्यात ईराण तालिबानसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असलेला दिसतो आहे.

हे ही वाचा:

नदीत ११ जण बुडाले, तिघांचा मृत्यू

खरी अफगाण संस्कृती दर्शवण्याचा अफगाण महिलांचा प्रयत्न

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

संयुक्त राष्ट्र संघ अफगाणिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहे. तालिबानने महिला अधिकाराबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला काही आश्वासनं दिली होती, मात्र अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आल्यानंतर पुन्हा एकदा महिलांवर अत्याचार सुरु झाले आहेत. हेच पाहता संयुक्त राष्ट्रसंघाचे सोमवारी तालिबानच्या या कृत्याची निंदा केली. मिशेल बाचेलेट म्हणाल्या की, अफगाणिस्तानातील माजी सैन्य अधिकाऱ्यांची हत्या झाल्याचे पक्के पुरावे आहेत, त्यांच्या घरात काम करणाऱ्यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांनंतर त्यांचीही हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, माजी अधिकाऱ्यांचा तालिबानी सध्या शोध घेत आहेत आणि आंदोलनकर्ते आणि पत्रकारांवर हल्ले करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा