30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरराजकारणमुख्यमंत्री महोदय...आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत बैठक घेतल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. नराधमांना वाचक बसावा असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांवरच महिला अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा असे म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले भातखळकर?
मुख्यमंत्री महोदय आज सामन्यातून म्हणताहेत नराधमांना फासावर लटकवा. अहो मुख्यमंत्री महोदय संजय राठोडचं काय झालं? त्या बिचाऱ्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करावा लागला आणि मग तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. अजून त्याचा साधा तपास होत नाही. करुणा शर्मांच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी एफिडेविटवर मान्य केले की तिच्याशी त्यांचे संबंध होते आणि त्यांना दोन अपत्ये आहेत. आज ती करुणा शर्मा तुरुंगात आहे. काय झालं त्या टी-सिरीजवाल्याचे? तुमचा मंत्रिमंडळातील सहकारी म्हणतो, ‘मरूदे तिला…मेली तरी चालेल’ असं म्हणणारा मंत्री. त्याचबरोबर मेहबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक अध्यक्ष बलात्काराचा एफआयआर झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर आधी कारवाई होत नाही.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक

मुख्यमंत्री महोदय तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेला आहे. शक्ती कायदा तुम्ही आणत नाही कारण तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री जे महिलांचे रक्षक असले पाहिजे तेच महिलांचे भक्षक बनले आहेत आणि त्यामुळे शक्ती कायद्याला विरोध होतोय. मुख्यमंत्री महोदय तुमचा सुसंस्कृतपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा