29 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरबिजनेसएनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा राजीनामा

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा राजीनामा

हेरगिरी, विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांमुळे वाद

Google News Follow

जगातील आघाडीची एआय चिप निर्मिती कंपनी एनव्हिडियाचे (Nvidia) सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय असलेल्या व्यावसायिक महिलेशी संबंध आणि कंपनीतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळाचे सदस्य या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

हुआंग यांच्याविरोधातील वादाला एलिस हुआंग या व्यावसायिक महिलेशी असलेल्या कथित संबंधांमुळे सुरुवात झाली. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांच्यावर चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे. त्या सिंगापूरस्थित मेगास्पीड इंटरनॅशनल या डेटा सेंटर कंपनीशी संबंधित होत्या. या कंपनीवर एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्सची बेकायदेशीरपणे चीनमध्ये निर्यात केल्याचा संशय आहे. मात्र, जेन्सेन आणि एलिस हुआंग यांच्यात कौटुंबिक संबंध नाहीत. एलिस या चीन सरकारसाठी काम करत असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असे हुआंग यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विवाहबाह्य संबंधांची कबुली दिल्यानंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, कंपनीतील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबतही हुआंग यांचे संबंध होते. या घडामोडींमुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

हे ही वाचा:

सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग

संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी

हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी कोलेट क्रेस यांच्याकडे अंतरिम सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या २०१३ पासून कंपनीत कार्यरत आहेत. कायमस्वरूपी उत्तराधिकारी निवडण्यासाठी कंपनी अंतर्गत आणि बाह्य उमेदवारांचा विचार करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा