28 C
Mumbai
Monday, September 14, 2026
घरबिजनेस“माझ्याविरोधात मीडिया मोहीम!”; सुभाष चंद्रांचा गंभीर आरोप

“माझ्याविरोधात मीडिया मोहीम!”; सुभाष चंद्रांचा गंभीर आरोप

२२ हजार कोटींच्या कर्जप्रकरणावरून खळबळ

Google News Follow

Related

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या मीडिया नेटवर्कवर गंभीर आरोप केल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चंद्रा यांनी आपल्या वैयक्तिक दिवाळखोरी आणि एनसीएलटी प्रकरणाच्या वृत्तांकनावर आक्षेप घेत, रिलायन्सशी संबंधित मीडिया संस्थांकडून आपल्याविरोधात चुकीची माहिती आणि ‘प्रोपगंडा’ पसरवला जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या दाव्यांना त्यांनी वैयक्तिक कर्ज म्हणून घेतले नसून, एस्सेल समूहातील कंपन्यांसाठी दिलेल्या वैयक्तिक हमींशी हे दावे संबंधित आहेत. एनसीएलटीने मंजूर केलेल्या योजनेनुसार त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून सुमारे ६.५ कोटी रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचे वृत्तांकन अशा पद्धतीने केले जात आहे की, जणू २२ हजार कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्ज केवळ ६.५ कोटी रुपयांत निकाली काढण्यात आले, असा दावा चंद्रा यांनी केला.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानवरील पकड ढिली पडल्यानंतर पाकिस्तानने घेतला दहशतवादाचा आधार

“समजावून थकलो, तरी चुका सुरूच!”; एफडीएला हायकोर्टाचा दणका

भगवान श्रीकृष्णाचे विचारच सर्वांना एकत्र आणू शकतात!

सज्जन कुमार यांच्या घरी गेलेल्या भाजपच्या ३ खासदारांना फटकारले

चंद्रा यांनी याच मुद्द्यावरून मुकेश अंबानी यांना थेट लक्ष्य करत, त्यांच्या मीडिया नेटवर्कमधील काही संस्थांकडून आपल्याविरोधात मोहीम सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी यापूर्वी अंबानींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले. यासोबतच त्यांनी २०१९ मधील झी एंटरटेनमेंटच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा आणि त्यानंतर झी ताब्यात घेण्याच्या कथित प्रयत्नांचा मुद्दाही उपस्थित केला. चंद्रांच्या दाव्यानुसार, आर्थिक अडचणींच्या काळात त्यांनी झी विकून कर्ज फेडण्याचा प्रस्ताव अंबानींसमोर ठेवला होता. मात्र, पुढे रिलायन्सने एका गुंतवणूकदारासोबत मिळून झीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप मात्र स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत.

दरम्यान, रिलायन्स ग्रुपने सुभाष चंद्रांचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. रिलायन्सने हे आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगत, समूहाच्या मीडिया ब्रँड्सचा वापर कधीही कोणाला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच सुभाष चंद्रा हे एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून आदरणीय असल्याचे सांगत रिलायन्सने त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे एनसीएलटीतील कर्ज प्रकरण, झी एंटरटेनमेंटशी संबंधित जुना कॉर्पोरेट संघर्ष आणि मीडिया रिपोर्टिंगवरून सुभाष चंद्रा विरुद्ध रिलायन्स यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा