28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरअर्थजगतटाटा कंझ्युमर... एकदम कडॅक!

टाटा कंझ्युमर… एकदम कडॅक!

Google News Follow

Related

टाटा समूहाच्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने चौथ्या तिमाहीत इतिहास रचला आहे. या कंपनीचा ३१ मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा जवळपास तिपटीने वाढला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा २३९ कोटी रुपये झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीत ७४ कोटी २५ लाख रुपये होता. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स ही जगातील सर्वात मोठी दुसरी ब्रँडेड चहा कंपनी आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड भारतात सात कोटी किलोग्रॅम चहाचे उत्पादन करते त्याशिवाय त्यांचे ५४ चहाचे मळे आणि अनेक पॅकेजिंग कारखाने आहेत. या कंपनीने सुमारे ५९ हजार लोकांना रोजगार दिला आहे. कंपनीकडे भारत आणि श्रीलंका, विशेषत: पूर्व भारतातील आसाम , पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील केरळमधील चहाचे मळे आहेत. ही कंपनी आसाम चहा आणि दार्जिलिंग चहाची सर्वात मोठी उत्पादक आहे.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने बुधवार, ४ मे रोजी आर्थिक वर्ष २०२१- २२ च्या मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला. या मार्च तिमाहीचा कंपनीचा निकाल ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा जवळपास तिपटीने वाढून २३९ कोटी रुपये झाला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत निव्वळ नफा ७४ कोटी २५ लाख रुपये होता. मात्र दर तिमाही आधारावर, कंपनीच्या नफ्यात मार्च तिमाहीत १७ पूर्णांक ६ टक्क्यांनी घट झालीय कारण डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २९० कोटी रुपये झाला होता. परंतु कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल साडे चार टक्क्यांनी वाढून ३ हजार १७५ कोटी झाला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत ३ हजार ३७ कोटी इतका होता. तस डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलामध्ये १ टक्क्यांची घट झाली होती. पण संपूर्ण आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये कंपनीचा महसूल सात टक्क्यांनी वाढून १२ हजार ४२५ कोटी झाला आहे. जो आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ११ हजार कोटी महसूल झाला होता.

संपूर्ण वर्षाच्या आधारावर, कंपनीने निव्वळ नफ्यात १० पूर्णांक ७ टक्के वाढ नोंदवून ९७४ कोटी ३६ लाख रुपयांची नोंद केली आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या कंपनीच्या कोल्ड ड्रिंक प्रॉडक्ट्सने महसूलामध्ये ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. अनेक नवीन लाँच आणि वितरण विस्तारामुळे कंपनीच्या कॉफीच्या उत्पन्नात वर्षभरात ४६ टक्के वाढ झाली आहे. या नवीन लाँचमध्ये Tata Coffee Gold, Tata Coffee Quick Filter चा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादनात आणि नफ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे, कोरोना महामारीत संपूर्ण जग लॉकडाऊन होते. लॉकडाऊन उघडल्यानांतर कंपनीने जलद रीतीने त्यांचे संपूर्ण री-ओपनिंग केले. महामारीनंतर कंपनीने अनेक नवीन स्टोअर्स नवीन शहरात देखील उघडलीत. तसेच या नफ्यात चहा आणि मिठाचा मोठा वाटा असल्याचे कंपनीचे सीईओ सुनील डिसोझा म्हणाले.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी ही पुन्हा एफएमसीजी फर्म मध्ये प्रवेश करणार आहे. एफएमसीजीचा फुल्ल फॉर्म Fast-Moving Consumer Goods असा आहे. एफएमसीजी म्हणजे असे प्रॉडक्ट्स जी तुलनेने कमी किमतीत असतात पण पटकन विकले जातात. भारतातील एफएमसीजी कंपन्या पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, प्रसाधने,शीतपेये तसेच उपभोग्य वस्तू यासह अनेक वस्तूंचा यात समावेश असतो. कन्झ्युमर पॅकेज्ड गुड्स हे भारतीय अर्थव्यवस्थेतील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. ११९० च्या दशकात टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी एफएमसीजी प्रॉडक्ट्स मधून बाहेर पडली होती आता पुन्हा या क्षेत्रात ही कंपनी प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे लवकरच आपल्यला एफएमसीजी क्षेत्रात टाटा समूहाची टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी दिसेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा