30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरराजकारणसलमान म्हणतो, 'आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य'

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

Related

ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेल्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरिल बायोपिक अर्थात चरित्रपट येऊ घातला आहे. प्रविण तरडे हा चित्रपट घेऊन येत आहेत. शनिवार, ७ मे रोजी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. पण यावेळी जास्त चर्चेत राहिले ते बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याचे भाषण.

७ मे रोजी पार पडलेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक दिग्गज उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, ‘सामना’ च्या संपादक रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत , मंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान, अभिनेता रितेश देशमुख असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात बोलताना सलमान खान याने त्याच्यात आणि आनंद दिघे यांच्यात दोन साम्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याला समजले की आनंद दिघे हे एका खोलीत राहत होते. त्यावर सलमान म्हणाला की मी देखील एकाच खोलीत राहतो. तर आदित्य ठाकरेंकडून सलमानला समजले की त्याच्यात आणि आनंद दिघे यांच्यात आणखीन एक साम्य आहे. ते म्हणजे आनंद दिघे हे देखील अविवाहित होते आणि सलमानही अविवाहित आहे.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्ते यांचे टार्गेट आता ‘एसटी बँक’

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

सलमानचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. १३ मे रोजी ‘धर्मवीर’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघे यांच्या मुख्य भूमिकेत दिसणा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा