32 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरक्राईमनामापोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास

पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास

Related

ठाणे- नाशिक महामार्गावर एका वयोवृद्ध महिलेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार अज्ञात आरोपींनी या महिलेला पोलीस असल्याचे सांगून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी चोरट्यांनी १ लाख २० हजाराचे दागिने लंपास केले आहेत. कोनगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित महिला शुक्रवारी सकाळी नाशिक महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होती. दरम्यान, स्पोर्ट बाईकवर आलेल्या चार जणांनी या महिलेची रिक्षा अडवली आणि आपण पोलीस असल्याचे भासवलं. तसेच इथून पुढे प्रवास करणार असाल, तर गळ्यातील दागिने काढून पाकिटात सुरक्षित ठेवा, असा सल्ला त्यांनी या महिलेला दिला. त्याचवेळी दागिने पाकिटात ठेवण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करत दागिने गायब केले. आरोपी घटनास्थळावरुन निघून गेल्यानंतर संबंधित महिलेने आपलं पाकिट तपासलं. त्यावेळी पाकिटात दागिने नसल्याचे तिच्या  लक्षात आले.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये घराबाहेर पडताना बुरखा घालणे बंधनकारक

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’

त्यानंतर महिलेने कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ४२० (फसवणूक) आणि कलम १७० (सरकारी कर्मचारी असल्याचं भासवणं) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपी नेमके कोण होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नसून घटनेचा पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,884अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा