31 C
Mumbai
Friday, May 13, 2022
घरराजकारणठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यात आता रोहित पवार हे आता अयोध्या येतेच रामलल्लाच्या चरणी नतमस्तक व्हायला जाणार आहेत. सध्या राज्यात रोहित पवार यांच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आता हिंदुत्वाचे वेध लागलेत का? असा सवाल विचारला जात आहे.

रोहित पवार हे सध्या चार दिवसांच्या तीर्थयात्रेवर आहेत. रोहित पवार चे सहकुटुंब ही यात्रा करत आहेत. या दरम्यान ते विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आहेत. या दौऱ्याचा भाग म्हणून काल म्हणजेच शुक्रवार ६ मे रोजी त्यांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ या स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे वास्तव्य असलेल्या स्थानाचे दर्शन घेतले.

तर शनिवार, ७ मे रोजी ते दुपारी अयोध्येला पोहोचणार आहेत. यावेळी ते अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानावर विराजमान असलेल्या राम लल्लाच्या मंदिराला भेट देणार आहेत.

हे ही वाचा:

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लीम डॉक्टरांनी दान केली एवढी मालमत्ता

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी

महाराष्ट्रात सध्या मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये अयोध्या दौऱ्याची चढाओढ सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. तर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण या दोघांच्या आधीच रोहित पवार यांनी आयोध्या गाठल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,979चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,190सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा