32 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरविशेषविलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

Related

मुंबईतील विलेपार्ले येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. विलेपार्ले पश्चिम येथे असणाऱ्या एलआयसी कार्यालयाला शनिवार, ७ मे रोजी सकाळी भीषण आग लागली. या आगीत एलआयसी कार्यालयाचा संपूर्ण मजला जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एलआयसीच्या विले पार्ले पश्चिम येथे असलेल्या कार्यालयाच्या एका मजल्यावर शनिवारी सकाळी अचानक आग लागली. सुदैवाने यावेळी कार्यालयात जास्त कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. या आगीत काही महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लीम डॉक्टरांनी दान केली एवढी मालमत्ता

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, त्यांच्याकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा