29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरराजकारण'उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी'

‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’

Related

खासदार नवनीत राणा ह्या तीन दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होत्या. दरम्यान, नवनीत राणांना आज, ८ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी नवनीत राणांच्या स्वागतासाठी अनेक महिला कार्यकर्त्या रुग्णलयात आल्या होत्या. या महिला कार्यकर्त्यांनी नवनीत राणांचे औक्षण केले आणि जय श्री रामचा नारा दिला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. त्या म्हणाल्या, राज्यात जर हनुमान चालीसा आणि रामाचे नाव घेणं जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे तुरुंगात जायला तयार आहे. लढायला तयार आहे. फक्त हनुमान चालीसा पठनासाठी ही जी काही कारवाई केली ती पूर्ण जनतेने बघितली आहे. तसेच नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे.

राज्यातील कोणत्याही मतदार संघातून माझ्या विरोधात उद्धव ठाकरे उभे राहा. जनता कोणाला मत देते हे आपण बघूया, असं खुलं आव्हानच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. पुढे त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पॉवरचा दुरुपयोग करत आहेत. उद्धव ठाकरे हे जनतेच्या मताने मुख्यमंत्री बनलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही मतदार संघात माझ्यविरोधात येऊन जनतेचे मत मिळवू दाखवावे, असं मी त्यांना खुलं आव्हान करत असल्याचे राणा म्हणाल्या.

भ्रष्टाचाराला हरवण्यासाठी मी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरणार असल्याचेही राणांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मुंबई ही भ्रष्टाचाराची लंका झाली आहे. मुंबईला भ्रष्टाचारातुन मुक्त करण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत मी प्रचारासाठी उतरणार आहे. ज्यांना हा मुंबईतील भ्रष्टाचार नाहीसा करायचा आहे त्यांना माझी गरज असेल त्यांच्यासाठी मी प्रचाराला उतरणार आहे. मला जी काही तुरुंगात वागणूक दिली, माझ्यावर अत्याचार केले. मला स्पॉन्डिलोसिसचा आजार आहे हे मी प्रशासनाला सांगितले असतानाही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. मला अनेक तास उभं करून ठेवले. प्रशासन हे दबावाखाली करत होते, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

हे ही वाचा:

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

गुणरत्न सदावर्ते यांचे टार्गेट आता ‘एसटी बँक’

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

मुंबईतीत प्रशासनाचा दबावाखाली चाललेला कारभार दिल्लीला जाऊन सांगणार असल्याचेही नवनीत म्हणाल्या. दरम्यान सध्या अयोध्यला जाणार म्हणून जी असली नकलीची बॅनरबाजी चालली आहे त्यावरून सुद्धा नवनीत राणांनी निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, आता शिवसेनेला असली नकली सिद्ध करण्याची वेळ आली आहे. शिवसेनमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे हेच असली होते असंही राणा म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा