30.4 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरबिजनेसटाटा सन्सच्या अध्यक्षांची मेलोनी यांच्याशी भेट

टाटा सन्सच्या अध्यक्षांची मेलोनी यांच्याशी भेट

इटलीच्या कंपनीसोबत टाटांचा मोठा करार

Google News Follow

भारतीय उद्योगविश्वातील आघाडीचा टाटा समूह जागतिक वाहन उद्योगात आपले स्थान अधिक भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रोम येथील पलाझो चिगी या सरकारी मुख्यालयात भेट घेतली. टाटा मोटर्सने इटलीतील प्रसिद्ध व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी इव्हेको ग्रुपचे अधिग्रहण केल्यानंतर ही भेट झाली. या बैठकीत चंद्रशेखरन यांनी अधिग्रहणानंतरची टाटा समूहाची व्यावसायिक रणनीती मांडली. तसेच भारत आणि इटली यांच्यातील औद्योगिक आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

टाटा मोटर्सने इव्हेको ग्रुपमधील ८९.४२ टक्के हिस्सेदारी तब्बल ३.४३ अब्ज युरो म्हणजेच सुमारे ३६ हजार कोटी रुपयांना संपादित केली आहे. ३० ऑक्टोबर रोजी या व्यवहारातील सुरुवातीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इव्हेको ही टाटा मोटर्सची अप्रत्यक्ष उपकंपनी बनली आहे. या व्यवहारामुळे टाटा समूहाला युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ट्रक, बस आणि अत्याधुनिक इंजिननिर्मिती क्षेत्रातील इव्हेकोचे तंत्रज्ञान आणि अनुभव टाटा मोटर्सच्या जागतिक विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हे ही वाचा:
संसदेत समोरासमोर या, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल!

अभूतपूर्व गर्दीच्या दाव्यानंतर २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे निलंबन!

विश्वविजयाने घराघरांत पोहोचलो; स्मृती मानधना भारावली!

व्हीलचेअरवरून जागतिक भरारी; भाविनाचा ऐतिहासिक पराक्रम!

या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे व्यावसायिक वाहननिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावरील मोठा उद्योगसमूह तयार झाला आहे. संयुक्त उद्योगाची उपस्थिती १३० हून अधिक देशांमध्ये असून एकत्रित वार्षिक महसूल सुमारे २१ अब्ज युरो म्हणजेच जवळपास २ लाख २८ हजार कोटी रुपये आहे. पुढील पाच वर्षांत वाहन विक्री, महसूल आणि नफाक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट कंपन्यांनी ठेवले आहे. त्यामुळे भारतीय वाहन उद्योगाला जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अधिग्रहण प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल चंद्रशेखरन यांनी इटली सरकार आणि पंतप्रधान मेलोनी यांचे आभार मानले. त्यांनी टाटा मोटर्सचे इटलीतील ट्युरिन शहराशी असलेले जुने संबंधही अधोरेखित केले. १९९० च्या दशकात रतन टाटा यांनी भारताची पहिली स्वदेशी प्रवासी कार विकसित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ट्युरिनमधील इटालियन डिझाइन कंपनीची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे हा व्यवहार केवळ दोन कंपन्यांमधील व्यावसायिक करार न राहता भारत-इटली औद्योगिक भागीदारीला नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा