29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरबिजनेसआता क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही

आता क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही

‘यूपीआय टॅप अँड पे’ची नवी सुविधा

Google News Follow

यूपीआय पेमेंटचा अनुभव आणखी सोपा आणि वेगवान करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच एनपीसीआयने ‘यूपीआय टॅप अँड पे’ ही नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता प्रत्येक वेळी क्यूआर कोड स्कॅन करण्याची किंवा रक्कम टाइप करण्याची गरज भासणार नाही. एनएफसी सुविधेला सपोर्ट करणारा स्मार्टफोन थेट व्यापाऱ्याच्या पॉइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशीनवर टॅप करून पेमेंट करता येणार आहे.

या सुविधेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पाच हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज नसेल. मात्र पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी पिन आवश्यक राहणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकाच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले तरी ही सुविधा वापरता येईल. पीओएस मशीनच्या इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण केला जाईल.
हे ही वाचा:
आयफोन १८ प्रोची आजपासून प्री-बुकिंग

दक्षिण कोरियाला ५-१ ने लोळवत भारताची फायनलमध्ये दिमाखात एंट्री

बुमराहच्या पुनरागमनाने टीम इंडिया मजबूत

भारताची नजर विक्रमी आठव्या जेतेपदावर

सुरक्षिततेसाठी या प्रणालीमध्ये टोकनायझेशनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाचे बँक खाते किंवा यूपीआयशी संबंधित संवेदनशील तपशील थेट व्यापाऱ्याला मिळणार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ही सुविधा सादर केली. एनपीसीआयने यासोबत ‘माय यूपीआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यासपीठही सादर केले आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट आणखी वेगवान, सोपे आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा