अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला “मृत अर्थव्यवस्था” म्हटले आहे यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्पची तुलना शाळेतल्या गुंडगिरी करणाऱ्या वात्रटपणा करणाऱ्या मुलांशी करताना थरूर म्हणाले की अमेरिकेने चुकीच्या देशाला लक्ष्य केले आहे. भारताच्या स्वाभिमानाची सौदाबाजी करता येत नाही ऐसे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
थरूर म्हणाले, “ट्रम्प यांनी भारताशी अशा प्रकारे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारतात कोणतेही सरकार असो, कोणताही पक्ष सत्तेत असो, आपल्या स्वाभिमानाच्या किंमतीवर कोणतीही तडजोड करता येत नाही. हो, जोपर्यंत या मुद्द्याचा प्रश्न आहे, आपण पुढील तीन आठवड्यात थंड मनाने, थंड वृत्तीने बोलले पाहिजे आणि आपल्या काही मर्यादा का आहेत हे अमेरिकेला समजावून सांगितले पाहिजे. आपल्या देशाची ७० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशावेळी स्वस्त अमेरिकन धान्य देऊन आपण त्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही.”
त्यांनी आठवण करून दिली की ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळातही भारताने काही बाबींमध्ये लवचिकता दाखवली होती, जसे की हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींवर आयात शुल्कात सूट देणे. थरूर यांच्या मते, या सवलतीचा भारतातील सामान्य लोकांवर परिणाम झाला नाही, कारण एवढी महागडी बाईक फक्त मर्यादित वर्गातील लोकच घेऊ शकतात.
हे ही वाचा :
E२० पेट्रोलवरील अफवा गडकरींनी फेटाळल्या, म्हणाले – एखादे उदाहरण द्या!
घरगुती गॅसच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तेल कंपन्यांना ₹३०,००० कोटींची मदत मिळणार!
प्राप्तिकर विधेयक २०२५ मागे घेतले!
५०% टॅरिफचा ट्रंपबम? भारतासाठी तर तो ‘अब्बा-डब्बा-जब्बा’च!
थरूर यांच्या या विधानाने भारत अमेरिकेच्या कोणत्याही दबावाखाली आपल्या मूलभूत हितांचा त्याग करणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यांचा संदेश केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनाच नव्हता, तर जगाला हे दाखवून देण्यासाठी होता की भारताची धोरणे त्यांच्या लोकांच्या हितावर आधारित आहेत, कोणत्याही जागतिक शक्तीच्या भीतीवर नाही.







