29 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरबिजनेसअमेरिकेचा भारतावर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्काचा प्रस्ताव

अमेरिकेचा भारतावर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्काचा प्रस्ताव

चीनवर ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफची टांगती तलवार

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार धोरणात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भारतासह १४ प्रमुख व्यापारी भागीदार देशांवर नव्याने आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार भारतीय वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम झाल्यास हे शुल्क १७ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २० टक्के अतिरिक्त शुल्क प्रस्तावित करण्यात आले असून, दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा अपयशी ठरल्यास हे शुल्क ४० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) केलेल्या आठ महिन्यांच्या तपासणीनंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संबंधित देशांमध्ये उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक औद्योगिक उत्पादन होत असल्याचा आणि त्याचा अमेरिकेतील स्थानिक उद्योगांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे. भारतासोबतच बांगलादेश, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, थायलंड, व्हिएतनाम, तैवान, चीन आणि युरोपीय महासंघातील देशांनाही या प्रस्तावित शुल्काचा सामना करावा लागणार आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय महासंघासाठी १५ टक्के शुल्काचा प्रस्ताव आहे, तर व्हिएतनामसारख्या देशांवर तुलनेने अधिक शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

या निर्णयाचा भारतीय निर्यातदारांवर विशेष परिणाम होऊ शकतो. अमेरिका ही भारतासाठी महत्त्वाची निर्यात बाजारपेठ असल्याने वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उत्पादन क्षेत्रांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आयात शुल्क वाढल्यास भारतीय वस्तू अमेरिकन बाजारपेठेत महाग होऊ शकतात. परिणामी भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता कमी होण्याचा धोका आहे. दुसरीकडे, भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम झाल्यास १७ टक्के शुल्काची तरतूद भारतीय निर्यातदारांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकते.

मात्र, हा प्रस्ताव अद्याप अंतिम निर्णय नाही. अमेरिकेकडून सार्वजनिक सूचना, हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शुल्क लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जानेवारी २०२७ पर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे भारतासमोर आता अमेरिकेसोबत व्यापार संबंध संतुलित ठेवण्याबरोबरच निर्यातदारांचे हित जपण्याचे आव्हान असेल. ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारात पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि पुरवठा साखळीवरही उमटण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा