30 C
Mumbai
Friday, January 16, 2026
घरबिजनेसव्हेनेझुएलाचा भारतासोबतचा व्यापार खूपच कमी

व्हेनेझुएलाचा भारतासोबतचा व्यापार खूपच कमी

अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही

Google News Follow

Related

व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितले आहे की व्हेनेझुएला आणि भारत यांच्यातील व्यापाराचे प्रमाण खूपच कमी आहे आणि या घडामोडीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. काराकास येथील भारतीय दूतावासाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, २०२३–२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १.१७५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता.

भारताकडून व्हेनेझुएलाला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये खनिज इंधन व कच्च्या तेलावर आधारित उत्पादने, बिट्युमिनस पदार्थ, औषधी (फार्मा) उत्पादने, कापूस, अणुऊर्जा रिऍक्टर, बॉयलर, यंत्रसामग्री, विद्युत यंत्रे व उपकरणे, वस्त्रे व परिधान, विविध रासायनिक उत्पादने आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते द्विपक्षीय व्यापार अत्यल्प असून भारत मुख्यतः व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात करतो.

हेही वाचा..

भारतीय सेनेचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

हम न बटेंगे और न ही कटेंगे

कशासाठी केंद्र सरकारचे विविध विभाग एकत्रितपणे काम करणार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल

दूतावासाच्या माहितीनुसार कच्च्या तेलाव्यतिरिक्त भारत व्हेनेझुएलाकडून मेण, लोखंड व पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, अन्नधान्य, तांबे व त्याची उत्पादने, शिसे व त्याची उत्पादने, जस्त व त्याची उत्पादने, लाकूड व लाकडापासून तयार केलेली उत्पादने इत्यादींचीही आयात करतो. ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल) आणि कॉर्पोरेशियन व्हेनेझोलाना डेल पेट्रोलिओ (सीव्हीपी) (पीडीव्हीएसएची उपकंपनी) यांनी सॅन क्रिस्टोबल भागात तेल उत्पादन व अन्वेषणासाठी “पेट्रोलराइंडोव्हेनेझोलाना एस.ए.” नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. यामध्ये ओव्हीएलचा ४० टक्के वाटा असून पीडीव्हीएसएकडे उर्वरित ६० टक्के हिस्सा आहे.

सॅन क्रिस्टोबल प्रकल्पात ओव्हीएलची गुंतवणूक सुमारे २०० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे. एप्रिल २००८ मध्ये ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल), स्पेनची रेपसोल आणि मलेशियाची पेट्रोनास यांचा समावेश असलेल्या एका आंतरराष्ट्रीय कन्सोर्टियमला व्हेनेझुएलाच्या ओरिनोको पट्ट्यातील काराबोबो येथील बहु-मिलियन डॉलरच्या तेल प्रकल्पासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेचा विजेता घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेझ यांनी शनिवारी सांगितले की शनिवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार) काराकास, मिरांडा, अरागुआ आणि ला गुएरा येथे झालेल्या अमेरिकी हल्ल्यानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांना “अटक करण्यात आली असून” त्यांना देशाबाहेर “नेण्यात आले आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा