29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरबिजनेसझोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांचा राजीनामा

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांचा राजीनामा

ईटरनलमध्ये मोठा नेतृत्वबदल

Google News Follow

Related

ईटरनल लिमिटेड (पूर्वीची झोमॅटो लिमिटेड) या आघाडीच्या फूडटेक कंपनीत मोठा नेतृत्वबदल जाहीर करण्यात आला आहे. कंपनीचे संस्थापक आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपिंदर गोयल १ फेब्रुवारी २०२६ पासून CEO पदावरून पायउतार होत आहेत. कंपनीच्या निर्णयानुसार, ब्लिंकिट़चे विद्यमान सीईओ आणि क्विक-कॉमर्स क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व अलबिंदर सिंग धिंदसा हे ईटरनलचे नवे ग्रुप सीईओ म्हणून जबाबदारी स्वीकारतील.

राजीनाम्यानंतर दीपिंदर गोयल हे कंपनीचे व्हाइस चेअरमन आणि बोर्ड डायरेक्टर म्हणून कायम राहणार असून, ईटरनलच्या दीर्घकालीन धोरणात्मक दिशादर्शनात सक्रिय भूमिका बजावणार आहेत. २००८ मध्ये झोमॅटोची स्थापना झाल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने खाद्य वितरणासह क्विक-कॉमर्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
आपल्या निवेदनात गोयल यांनी स्पष्ट केले की, भविष्यातील काळात ते उच्च धोका असलेले आणि प्रयोगात्मक प्रकल्प हाताळू इच्छितात. सार्वजनिक कंपनीचा सीईओ म्हणून दैनंदिन ऑपरेशनल जबाबदाऱ्या सांभाळताना अशा प्रयोगांना पुरेसा वाव मिळत नाही, म्हणूनच त्यांनी सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सुनिता विल्यम्स यांची ‘नासा’तून निवृत्ती

उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील १० बेकायदेशीर मझारी जमीनदोस्त

रायगड जिल्ह्याच्या आमूलाग्र विकास, आले १ लाख कोटी

सोने-चांदींच्या दराने डोळे दिपले!

दरम्यान, अलबिंदर सिंग धिंदसा यांनी ब्लिंकिटचे नेतृत्व करत त्वरित वितरण व्यवसाय मजबूत केला असून, तो ब्रेक-ईव्हन टप्प्यावर आणण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ऑपरेशनल अनुभवामुळे ईटरनलच्या दैनंदिन कामकाजाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली आहेत.

आर्थिक आघाडीवरही कंपनीची कामगिरी सकारात्मक आहे. शेवटच्या तिमाहीत ईटरनलचा निव्वळ नफा ७३ टक्क्यांनी वाढून ₹१०२ कोटींवर पोहोचला असून, कामकाजातून होणारे उत्पन्नही मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.
या नेतृत्वबदलामुळे भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्थिर आणि मजबूत स्थितीत असलेल्या कंपनीत संस्थापक सीईओ ने ऑपरेशनल नेतृत्व इतर अनुभवी नेत्याकडे सोपवणे, हा बदल उद्योगासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा